आगामी वनडे विश्वचषकासाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा मंगळवारी (15 ऑगस्ट) केली जाण्याची शक्यता आहे. इंग्लंड या विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड व कर्णधार जोस बटलर यांनी रणनिती आखली असून, कसोटी संघाचा कर्णधार व दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला ते आपले निवृत्ती मागे घेण्याची विनंती करणार आहेत.
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. व्यस्त वेळापत्रक तसेच कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटलेले. त्यानंतर आता यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी तो पुन्हा एकदा आपली निवृत्ती माघारी घेत इंग्लंडसाठी खेळू शकतो असे अनेक जण म्हणतात दिसत आहेत. स्वतः स्टोक्सने आपण निवृत्ती मागे घेणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इंग्लंड वनडे संघाचा कर्णधार जोस बटलर याने स्टोक्स याला विश्वचषकासाठी आपली वनडे निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्टोक्स याला चर्चेसाठी निमंत्रित केल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
स्टोक्स हा 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा मानकरी होता. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात योगदान देत या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली होती.
यासोबतच प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला देखील संघात समाविष्ट करण्यासाठी बटलर इच्छुक आहे. मात्र, आर्चरची दुखापत किती गंभीर आहे याबाबत माहिती दिली गेली नाही.
(England management is set to talk with Ben Stokes to come back into the ODI for the World Cup)
महत्वाच्या बातम्या –
शफाली वर्मासह विमानतळावर गैरवर्तन! ट्विटरवर सांगितली आपबिती, वाचा संपूर्ण प्रकरण
यष्टीरक्षक सॅमनससह कुलदीपने दाखवली चपळाई, टीम इंडियासाठी घेतले दोन जबरदस्त कॅच




