रविवारी (१२ जुलै) वेस्ट इंडिजने इंग्लंड विरुद्ध साऊथँम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळविला. त्याबरोबरच ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता गुरूवारपासून (१६ जुलै) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
या सामन्यापूर्वी मॅनचेस्टरमध्ये झालेल्या पावसामुळे इंग्लंड संघाला मैदानावर सराव करता आला नाही, त्यामुळे इंग्लंड संघाने ओल्ड ट्रॅफर्ड येथे इनडोअर नेटमध्ये सराव केला.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघामध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि मार्क वूड (Mark Wood) यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर सॅम करन (Sam Curran) आणि ऑली रॉबिनसन (Ollie Robinson) या २ गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. रॉबिनसनला पहिल्यांदाच इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.
याव्यतिरिक्त कन्यारत्न प्राप्त झालेला इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूटचे (Joe Root) पुनरागमन झाले आहे, तर जो डेन्लीला (Joe Denly) संघातून वगळण्यात आले आहे.
https://twitter.com/ICC/status/1283422878319484930
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ-
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, डॉमिनिट बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, झॅक क्राऊले, सॅम करन, ऑली पोप, ऑली रॉबिनसन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.






