इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील पहिला सामना (२ जून) लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे, तर या सामन्यातून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी संघात पुनरागमन केले आहे.
या सामन्यात नाणेफेकीदरम्यान स्टोक्सने (Ben Stokes) जी जर्सी घातली होती, त्यावर ‘थोर्प’ असे नाव आणि ‘५६४’ हा क्रमांक लिहिला होता. थोर्प हे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्राहम थोर्प हे आहेत. तर ५६४ क्रमांकाची त्यांची कॅप आहे. ते इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारे ५६४वे खेळाडू आहेत. सध्या ते गंभीर आजारी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर त्यांना सहकार्य करण्यासाठी स्टोक्सने ती जर्सी घातली आहे. स्टोक्सचा ती जर्सी घातलेला फोटो इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर शेयर केला आहे.
“थोर्प हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. सगळ्यांनाच माहित आहे की ते सध्या खूप आजारी आहेत. त्यांच्या पत्नीशी मी बोललो. त्यांना सुरक्षा आणि सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहे,” असे स्टोक्स म्हणाला.
थोर्प यांनी इंग्लंडकडून १९९३-२००५च्या दरम्यान १०० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानी ४४.६६च्या सरासरीने ६७४४ धावा केल्या आहेत. यात १६ शतके आणि ३९ अर्धशतके यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी ८२ वनडे सामनेही खेळले आहेत.
यावर्षीच्या फेब्रुवारीपर्यत थोर्प हे इंग्लंड पुरूष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-०ने पराभव केल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. तर मार्चमध्ये त्यांना अफगानिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते.
https://twitter.com/englandcricket/status/1532292917037088768?s=20&t=LB6bUik16oxSCAGEnX19gA
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जेम्स अँडरसनने (James Anderson) जबरदस्त पुनरागमन आणि मॅथ्यू पॉट्सने शानदार कसोटी पदार्पण केले आहे. दोघांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव १३२ धावांतच आटोपला. लॉर्ड्सची खेळपट्टी गोलंदाजीसाठी इतकी धोकादायक झाली आहे की, पहिल्याच दिवशी १७ विकेट्स पडल्या आहेत.
इंग्लंडलाही फलंदाजी करताना अनेक अडथळे आले. त्यांच्याही पहिल्या ७ विकेट्स पडल्या असून धावफलकावर ११६ धावा आहेत. यष्टीरक्षक बेन फोक्स नाबाद ६ आणि स्टुअर्ट ब्रॉ़ड नाबाद ४ धावा करत खेळपट्टीवर आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ
लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर
अफलातून! बेयरस्टोने घेतला न्यूझीलंडच्या ओपनरचा अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही कराल पठ्ठ्याचं कौतुक