इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 हंगामातील दुसरा सामना बुधवारी (28 जून) सुरू झाला. मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही इंग्लंडने नाणेफेक जिंकली. पण यावेळी प्रथम फलंदाजी करण्याऐवजी इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्वाचा बादल पाहायला मिळाला.
पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऍशेस मालिकेसाठी वर्षभर सराव करत होता. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यात त्याला बेंचवर बसवले गेले होते. बुधवारी (28 जून) ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले. स्कॉट बोलँड (Scott Boland) याला बाहेर बसवून स्टार्कला संघात घेतले गेले.
स्कॉट बोलँड ऑस्ट्रेलियन संघात नवखा असला, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. भारताविरुद्ध खेळलेल्या डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलायने 209 धावांनी जिंकला होता. या विजयासाठी बोलँडने पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. हे महत्वपूर्ण प्रदर्शन पाहून संघ व्यवस्थापनाने ऍशेस 2023च्या पहिल्या कसोटीसाठी त्याला संघात कायम ठेवले आणि स्टार्कला बेंचवर बसवले. ऍशेससाठी इंडियन प्रीमियर लीग न खेळणारा स्ट्राक संघातून बाहेर असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याचे संघात पुनरागमन झाले. अशात लॉर्ड्सवर स्टार्क इंंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे पाहण्यासारखे असेल.
दुसऱ्या इंग्लंडने मात्र, दुसऱ्या ऍशेस कसोटीसाठी एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (27 जून) आपला संघ घोषित केला होता. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली दुखापतीतून अद्याप सावरला नसल्यामुळे जोश टंग वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले आहे. (England opt to field in the second #Ashes Test. Australia bring in Mitchell Starc for Scott Boland )
दुसऱ्या ऍशेस कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जोश टंग, जेम्स अँडरसन.
ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नेथन लियॉन, जोश हेझलवूड.
महत्वाच्या बातम्या –
पुणेरी बाप्पा की कोल्हापूर टस्कर्स, कुणाला मिळणार MPL Finalचे तिकीट, ‘क्वालिफायर 2’ सामना ठरणार निर्णायक
श्रीलंकेच्या महिलांचा नादच खुळा! न्यूझीलंडच्या नांग्या ठेचत रचला इतिहास, कर्णधार अटापट्टूचे विक्रमी शतक