मुंबई | आज आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारताला (१२२) मागे टाकत इंग्लडने (१२५)अव्वल स्थान पटकावले आहे. २०१३ नंतर प्रथमच इंग्लड आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आले आहे.
२०१४-१५ या काळात खेळलेल्या वनडे सामन्यांचे निकाल क्रमवारीतून काढून टाकत आयसीसीने आज नविन क्रमवारी जाहीर केली. तसेच यात २०१५-१६ तसेच २०१६-१७ या वर्षातील कामगिरीला ५०% महत्त्व देण्यात आले आहे.
आयसीसी दरवर्षी नव्याने वार्षिक क्रमवारीचा आढावा घेते. त्यामुळे संघांच्या क्रमवारीत मोठ्या प्रमाणार बदल होतात. याचाच फटका भारताला वनडे क्रमवारीत बसला आहे. कसोटी आणि टी२० क्रमवारीत मात्र भारताला याचा मोठा फायदा झाला आहे.
इंग्लंडला यामुळे तब्बल ८ गुणांचा फायदा होऊन त्यांचे १२५ गुण झाले. २०१४-१५ या हंगामात इंग्लंड संघ २५ पैकी जेमतेम ७ सामने जिंकला होता. आता या सामन्यांचे गुण क्रमवारीतुन काढून टाकल्यामुळे इंग्लंडला याचा जोरदार फायदा झाला.
तर दक्षिण आफ्रिकेला ४ गुण गमवावे लागल्यामुळे त्यांचे ११७ वरुन ११३ गुण झाले. त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या फेकले आहेत.
भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल pic.twitter.com/omHtqRWjfU
— Sharad Bodage (@SharadBodage) May 2, 2018
भारतीय संघाने आपला एक गुण नविन क्रमवारीत गमावला आहे. याचाच अर्थ आयसीसी क्रमवारीत जो संघ अव्वल स्थानी आहे तोच २०१९ क्रिकेट विश्वचषकाचा आयोजक आहे. तर विश्वचषक विजेते आॅस्ट्रेलिया सध्या १०५ गुणांसह ५व्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…
–धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही
–बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल