---Advertisement---

Video- कोहली फॅन्सकडून सचिनच्या चाहत्यांना जोरदार प्रतित्तोर!

On: बुधवार, मे 2, 2018 4:39 PM
---Advertisement---

बंगळूरू। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची नेहमीच तुलना केली जाते. काल बंगळूरू येथे पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातही या दोन खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीची तुलना करण्यात आली.

ज्यामुळे विराटला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले. झाले असे की, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ईशान किशनने विराटच्या बॅटची कड घेतलेला चेंडूचा झेल घेतला.

परंतू पंचांनी विराटला नाबाद दिले. तसेच यष्टीरक्षक किशन आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांनाही खात्री नसल्याने त्यांनी रीव्ह्यू घेतला नाही. त्यामुळे विराटला जीवदान मिळाले. पण नंतर अल्ट्रा एजमध्ये चेंडू विराटच्या बॅटला लागला असल्याचे दिसून आले.

क्रिकेटमध्ये बऱ्याचदा एखादा खेळाडू जेव्हा असा बॅटची कड घेतलेल्या चेंडूवर बाद होतो तेव्हा मागे यष्टीरक्षकाकडे पहातो, पण काल विराटने यष्टीरक्षक किशनकडे न पहाता निरागसपणे खाली पाहिले. यामुळे पंचांसह रोहितचाही विराट बाद नसल्याचा भ्रम झाला.

त्यामुळे विराट बाद असूनही मैदानाबाहेर न गेल्याने त्याला ट्रोल करण्यात येत आहे. तसेच 2011 च्या विश्वचषकावेळी विंडिज विरूद्धच्या सामन्यात सचिनला पंचांनी नाबाद दिले असतानाही  खिलाडूवृत्ती दाखवून बाद असल्याचे मान्य करत मैदानाबाहेर गेला होता.

https://twitter.com/Toofani_Devil/status/991537558487224320

https://twitter.com/FarziCricketer/status/991343936894418944

https://twitter.com/DeepakNair1991/status/991343450493612032

याचीच आठवण करून देत विराटच्या कालच्या कृतीवर टीका होत आहे. विराटकडे सचिनसारखी खेलाडूवृत्ती नसल्याचे म्हटले जात आहे.

पण आज असाही एक व्हिडिओ सोशल मिडियावर आला आहे, ज्यात सचिन ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळत असताना बॅटची कड घेतलेल्या चेंडूवर यष्टीरक्षक गिलख्रिस्टने त्याचा झेल घेतला. पण पंचांनी नाबाद दिले. त्यामुळे सचिनने पुढे त्याचा खेळ कायम ठेवला.

त्यामुळे ज्यांनी विराटवर टिका केली त्यांच्यासाठी उत्तर म्हणून हा व्हिडिओ वायरल होत आहे.

विराटने काल 32 धावा केल्या. त्याला हार्दीक पंड्याने बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या –

डेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी

भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल

पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…

 धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही

बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment