---Advertisement---

NZ vs IND: न्यूझीलंडला डबल झटका; दोन स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर!

On: सोमवार, नोव्हेंबर 9, 2026 11:15 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका सुरू आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, न्यूझीलंड संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकणार नाही, तर वेलिंग्टन एकदिवसीय सामन्यादरम्यान चेंडू डोक्यावर लागल्यामुळे ब्लेअर टिकनरला पुढील सात दिवस मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू क्रिस्टियन क्लार्कचा संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डेव्हॉन कॉनवे आधीच या मालिकेतून बाहेर झाला होता.

न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी पुष्टी केली की, वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन टी-20 मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरलेला नाही. दुसरीकडे, ब्लेअर टिकनरच्या डोक्याला लागलेली दुखापत बरी झाली असली, तरी आयसीसीच्या नियमांनुसार त्याला सात दिवस विश्रांती घेणे आवश्यक आहे; परिणामी, तोही मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळू शकणार नाही. हॅमिल्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टिकनरच्या जागी के. क्लार्कला संघात स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी पुन्हा संघात सामील होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मॅट हेन्री आणि काईल जेमिसन हे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या कसोटी सराव शिबिरात सामील होणार होते. मात्र, आता हे दोघेही चौथ्या एकदिवसीय सामन्यापर्यंत संघासोबतच राहणार आहेत.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हेही स्पष्ट केले आहे की, मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात आणखी दोन खेळाडूंचा समावेश केला जाईल. याशिवाय, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स आणि नॅथन स्मिथ हे पाच खेळाडू तिसऱ्या सामन्यानंतर (बुधवारी) लगेच वेलिंग्टनला रवाना होतील, जेणेकरून ते कसोटी मालिकेची तयारी सुरू करू शकतील.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, क्रिस्टन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, काईल जेमिसन, निक केली, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट, नॅथन स्मिथ आणि विल यंग.

चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे, मॅट हेन्री, काईल जेमिसन, निक केली, टिम सायफर्ट आणि विल यंग.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---