इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक असं दृष्य दिसलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
झालं असं की, दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात खराब प्रकाशामुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सनं फिरकी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. श्रीलंकेच्या डावात अपुऱ्या उजेडामुळे वेगवान गोलंदाजी खेळणं कठीण जात होतं. जेव्हा अंपायरनं याबाबत इंग्लंडचा कर्णधार ओली पोप याला सांगितलं, तेव्हा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सनं फिरकी गोलंदाजी सुरू केली.
ख्रिस वोक्सनं आपल्या चौथ्या षटकातील 2 चेंडू वेगवान गोलंदाजी केली होती. मात्र त्यानंतर अंपायरच्या हस्तक्षेपामुळे त्याला आपल्या गोलंदाजीत बदल करावा लागला. वोक्सनं आपल्या षटकातील उर्वरित 4 चेंडू फिरकी गोलंदाजी केली. याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
ख्रिस वोक्सला फिरकी गोलंदाजी करताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मैदानावरील जो रूटची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. आपण काय पाहतोय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. वोक्सला फिरकी गोलंदाजी करताना पाहून पॅव्हेलियनमधील बेन स्टोक्स देखील हैराण झाला. त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
दुसऱ्या एका घटनेत इंग्लंडचे माजी फलंदाज आणि समालोचक नासीर हुसैन उजवीकडे वळण्याच्या प्रयत्नात खुर्चीवरूनच पडले. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही हे सर्व व्हिडिओ येथे पाहू शकता.
STOP WHAT YOU’RE DOING! ⚠️
Bad light means Chris Woakes is bowling spin 😆 pic.twitter.com/TPYSnwXiEN
— England Cricket (@englandcricket) September 7, 2024
— Gill Bill (@bill_gill76078) September 7, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडनं पहिल्या डावात 325 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दुसऱ्या दिवशी श्रीलंकेनं 5 विकेट गमावून 211 धावा केल्या आहेत. इंग्लंडनं 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे.
हेही वाचा –
‘पीसीबीच्या अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून मुशीर खानची खेळी दाखवण्याची गरज’, दिग्गजाच्या कानपिचक्या
Ganesh Chaturthi Special : सचिन तेंडुलकरने जल्लोषात केले बाप्पाचे स्वागत, वॉर्नरनेही दिल्या शुभेच्छा
भर मैदानात पंतची कुलदीपसोबत मस्ती! हेल्मेट ओढले, टी शर्ट खेचला; काय काय केले?