मुंबई । तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 1-0 ने पराभूत केल्यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. आज शुक्रवारपासून (28ऑगस्ट) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी20 मालिकेला सुरूवात होणार आहे. तीनही टी20 मालिका मॅंचेस्टरमध्ये खेळली जाईल. मात्र या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय या मालिकेतून बाहेर पडला आहे. जेसन रॉयला साईट स्ट्रेनची दुखापत झाली आहे.
जेसन रॉयसाठी पाकिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेबाहेर असणे हे केवळ संघासाठीच नाही तर त्याच्यासाठीही वाईट बातमी आहे. रॉय गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. लॉकडाऊनपासून तो फक्त 6 डाव खेळला असून यात तो अवघ्या 2 वेळा दुहेरी आकडा पार करू शकला आहे. आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही जेसन रॉय फ्लॉप ठरला होता.
साऊथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यात मिळून तो एकूण 25 धावा करू शकला होता. त्यानंतर तो सरेकडून प्रथम श्रेणी सामना खेळला, तिथे त्याने हॅम्पशायरविरुद्ध 4 आणि 14 धावांची खेळी केली. रॉयची टी20 आकडेवारीही फारशी विशेष नाही. त्याने 35 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 34.57 च्या सरासरीने 860 धावा केल्या आहेत. यात फक्त 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंड-पाकिस्तान टी -20 मालिकेचे वेळापत्रक
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेचा पहिला सामना 28 ऑगस्टला तर दुसरा टी -20 सामना 30 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. तिसरा सामना 1 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हे तीनही सामने मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळले जातील.
इंग्लंड संघ:
ओएन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम बेंटन, सॅम बिलिंग्ज, जो डॅन्ले, लुई ग्रेगरी, ख्रिस जॉर्डन, साकीब मेहमूद, डेव्हिड मालन, आदिल रशीद आणि डेव्हिड विले.
पाकिस्तान संघ:
बाबर आजम, आबिद अली, असद शफीक, अझर अली, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तीकर अहमद, इमाद वसीम, खुशदिल शाह, इमाम उल हक, मोहम्मद अब्बास, नसीम शाह, सरफराज अहमद, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शेनवारी, शोएब मलिक आणि यासिर शहा