इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) हा लॉर्ड्स कसोटीत 34वं शतक झळकावून आपल्या देशासाठी कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जो रूट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पेक्षा 3,544 धावांनी मागे आहे. तेंडुलकरच्या नावावर 15,921 धावा आहेत, तर रूटच्या नावावर 12,377 धावा आहेत. रूट सचिनच्या रेकाॅर्डजवळ पोहोचला आहे, या प्रश्नावर रूटनं खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटनं 34वं शतक झळकावलं, 34व्या शतकानंतर जेव्हा रुटला विचारण्यात आले की तो सचिनच्या रेकाॅड जवळ आला आहे आणि त्याची नजर तेंडुलकरच्या रेकार्डवर आहे का, त्यावर रूट म्हणाला, “मला फक्त माझ्या संघासाठी खेळायचे आहे, संघासाठी योगदान देऊ इच्छितो आणि जास्तीत जास्त धावा करू इच्छितो. शतक झळकावणं ही खूप छान भावना असते. कसोटीत संघाच्या विजयापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही आणि माझे लक्ष संघासाठी शक्य तेवढे योगदान देण्यावर आहे.”
1️⃣ Sachin Tendulkar – 15921 runs
⬆️ Joe Root – 12377 runsHalf an eye on Sachin’s record, Joe? 👀
— England Cricket (@englandcricket) August 31, 2024
ॲलिस्टर कूकचा रेकाॅर्ड मोडण्याच्या प्रश्नावर जो रूट (Joe Root) म्हणाला, “ॲलिस्टर कुकने मला खूप काही दिले आहे. माझ्या कारकिर्दीत त्यांनी खूप साथ दिली.”
रूटच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने इंग्लंडसाठी कसोटीत 2012 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने 145 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 50.33च्या सरासरीने 12,377 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 34 शतकं झळकावले आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे.
1877 मध्ये कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच 147 वर्षांत जो रूट ()Joe Root) हा इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रुटनं पहिल्या डावात 33वं कसोटी शतक आणि दुसऱ्या डावात 34वं कसोटी शतक झळकावलं. या धमाकेदार कामगिरीमुळे रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं देखील पूर्ण झालीआहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! 16 वर्षाच्या संपूर्ण कारकीर्दीत कधीच RUN-OUT झाला नाही ‘हा’ भारतीय
Paris Paralympics 2024: चाैथ्या दिवशी भारताच्या झोळीत येऊ शकतात आणखी 4 पदकं, पाहा वेळापत्रक
दमदार कामगिरीसह रूटच्या निशान्यावर सचिनचा ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’