जो रूट (Joe Root) याच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडचा संघ ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series 2021-22) मध्ये अत्यंत निराशादायी प्रदर्शन करतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीचे सलग ३ सामने गमावत इंग्लंडने प्रतिष्ठित ऍशेस मालिकाही गमावली आहे. यानंतरही त्यांच्यापुढील अडचणी वाढतानाच दिसत आहेत. सिडनी येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे ३ दिग्गज खेळाडू (England 3 Players Injured) दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे इंग्लंडच्या संघाची डोकेदुखी वाढली आहे.
सिडनी कसोटीदरम्यान इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आणि अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे या सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी खेळणे अवघड झाले आहे. तसेच इंग्लंडचा दुसरा यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यालाही फलंदाजी करतेवेळी हाताला जोरदार चेंडू लागला आहे. त्यामुळे एकसोबत इंग्लंडचे ३ खेळाडू जखमी होऊन संघाबाहेर होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्ज (Sam Billings) याला संघात सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटिश वृत्तपत्र इव्हिनिंग स्टँडर्समधील अहवालानुसार, सिडनी कसोटीदरम्यान बटलरच्या हाताच्या बोटाला झालेल्या जखमेनंतर त्याचे दुसऱ्या डावात यष्टीरक्षण करणे अवघड होऊन बसले आहे. दुखापतीनंतरही तो पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला होता. पण या डावात तो ७ चेंडूंचा सामना करताना खातेही न खोलता पव्हेलियनला परतला. यादरम्यान त्याला बॅट पकडण्यातही त्रास होत होता. तर अष्टपैलू स्टोक्स हा साईड स्ट्रेनचा सामना करतो आहे. याखेरीजही त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ६६ धावांची चिवट झुंज दिली होती. मात्र यानंतर तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दिसण्याची फारच कमी शक्यता आहे. तसेच तो फलंदाजीही करताना दिसू शकत नाही.
स्टोक्स आणि बटलरपेक्षा फलंदाज बेयरस्टोची दुखापत संघासाठी मोठी डोकेदुखी असणार आहे. फलंदाजी करताना त्याच्या हाताला चेंडू लागला आहे. मात्र त्याने या दुखापतीवर दुर्लक्ष करत दमदार शतकी खेळी केली आहे. तो सध्या नाबाद १०३ धावावर खेळतो आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीही तो फलंदाजी करताना दिसेल. परंतु दुखापतीमुळे त्याने यष्टीरक्षण करण्याची शक्यता फार कमी आहे.
अशा स्थितीत होबार्ट येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात सॅम बिलिंग्सला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच परिक्षेत ‘कर्णधार’ केएल राहुल फेल, जोहान्सबर्ग कसोटीत केल्या ‘या’ मोठ्या चूका
कॅरेबियन क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्यासाठी बोर्डाने कसली कंबर! दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
हेही पाहा-