---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटीत ‘या’ कारणामुळे इंग्लंड संघ काळी फीत बांधून उतरला मैदानात

On: सोमवार, डिसेंबर 27, 2021 5:44 PM
England
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सुरु असलेल्या ऍशेस कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. २६ डिसेंबरपासून या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याला सुरुवात झाली. रविवारी इंग्लंड संघ मैदानात उतरला तेव्हा प्रत्येक खेळाडूने काळी फीत दंडाला बांधली होती. त्यामुळे सर्वांनाच हा प्रश्न पडला की इंग्लंड संघाने काळी फीत का बांधली असेल.

शनिवार दि. २५ डिसेंबर रोजी इंग्लंडचे माजी क्रिकेटर रे इलिंगवर्थ (Ray Illingworth) यांचं कर्करोगाच्या आजारामुळे निधन झालं. इंग्लंडसाठी ऍशेस जिंकणाऱ्या या माजी कर्णधाराने ८९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंड संघाने काळी फीत बांधली होती.

रे इलिंगवर्थ यांनी १९५८ ते १९७३ पर्यंत ६१ कसोटी सामने खेळले. इलिंगवर्थ यांनी १९व्या वर्षीच यॉर्कशायरकडून (Yorkshire) पदार्पण केलं. आणि १९५१ पासून सुरु झालेली कारकीर्द ३२ वर्षांची होती. त्यांनी लेसेस्टरशायर संघाचेही (Leicestershire) प्रतिनिधित्व केले.

१९७०-७१ च्या ऍशेस मालिकेत त्यांनी नेतृत्व करताना ७ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला २-० अशा फरकाने विजय मिळवून दिला. त्यांनी कारकिर्दीत ३ एकदिवसीय सामने खेळले. तसेच प्रथम श्रेणीत ७८७ सामने खेळून २४ हजारांपेक्षा जास्ती धावा केल्या. यात २२ शतक आणि १०५ अर्धशतकांचा समावेश होता. इलिंगवर्थ यांनी २१८ लिस्ट ए सामने खेळून ४ अर्धशतकांसह २३८० धावा केल्या. तसेच कारकिर्दीत चक्क २२०० पेक्षा जास्ती विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/englandcricket/status/1474759701334265865

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ७२ व्या अॅशेस मालिकेत २-० ने पिछाडीवर असणारा इंग्लंड संघ बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशीच १८५ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि नेथन लायन (Nathan Lyon) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) २ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर ६१ धाव १ विकेट गमावून केल्या. ऑस्ट्रेलिया १२४ धावांनी पिछाडीवर होता.

दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या झटपट विकेट्स घेत त्यांना २६७ धावांत सर्वबाद केलं. जेम्स अँडरसनने (James Anderson) ४, तसेच ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि मार्क वूडने (Mark Wood) प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इंग्लंड फलंदाजीला येताच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी परत आक्रमण सुरु केले. मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलंडने (Scott Boland) इंग्लंडची ३१-४ अशी अवस्था केली. स्टार्क आणि बोलंड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इंग्लंड अजूनही ५१ धावांनी पिछाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

व्हिडिओ: मुलाखतीत व्यस्त असलेल्या वुडसोबत स्टोक्सची मस्ती; चिडून गोलंदाज म्हणाला, ‘बंद कर ते’ 

Ashes: मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावातही इंग्लंडची खराब सुरुवात; दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

दुख:द! माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन, प्रथम श्रेणीत नावे होत्या २४ हजार धावा अन् २००० विकेट्स

व्हिडिओ पाहा – त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---