---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळलेल्या इंग्लडच्या खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत मिळणार नाही संधी?

On: शनिवार, मे 15, 2021 5:36 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 हंगाम नुकताच 29 सामन्यांनंतर स्थगित झाला. त्यामुळे परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. काहीदिवसांपूर्वीच इंग्लंडचे खेळाडू देखील मायदेशी गेले असून क्वारंटाईन झाले आहेत. दरम्यान, असे वृत्त येत आहे की आयपीएलमधून परत आलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध २ जूनपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आयपीएलमध्ये खेळणार्‍या क्रिकेटपटूंना कोणत्याही सरावाशिवाय न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरवायचे नाही. असे झाल्यास जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, सॅम करन आणि मोईन अलीसारखे खेळाडू 2 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळू शकणार नाहीत.

या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी या आठवड्याच्या अखेरीस समाप्त होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. लॉड्स वर पहिली कसोटी सुरू होण्यासाठी त्यानंतरही दोन आठवडे शिल्लक आहेत.

बीबीसी स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या खेळाडूंसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. याचा अर्थ असा आहे की ऑली रॉबिन्सन, क्रेग ओव्हर्टन आणि जेम्स ब्राझी यासारख्या खेळाडूंना संधी मिळू शकेल. द इंडिपेन्डंटच्या वृत्तानुसार, कसोटी क्रिकेटचा सराव न करणे चिंताजनक आहे. इतर खेळाडू कित्येक आठवडे काऊंटी चॅम्पियनशिप खेळत आहेत. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड मंगळवारी निवड समितीची बैठक बोलावतील.

तत्पूर्वी, इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक ऍशले जाइल्स यांनी संकेत दिले होते की आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळवणे कठीण आहे. आयपीएलमध्ये इंग्लंडच्या 11 क्रिकेटपटूंनी भाग घेतला होता. बायो बबलमधील कोरोना संसर्गामुळे आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णासाठी देवदूत बनला युजवेंद्र चहल, ‘अशाप्रकारे’ केली मदत

लॅब्यूशेनला गोलंदाजी करणे म्हणजे क्लबमधील एखाद्या मुलीला इंप्रेस करण्यासारखे, अँडरसनची अजब प्रतिक्रिया

आयपीएल २०२१ हंगामात ‘हा’ संघ चॅम्पियनसारखा दिसला, गावसकरांनी केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---