टी२० विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करणारे इंग्लड आणि पाकिस्तान संघ यांच्यात लवकरच द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट संघ पुढील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर दोन अतिरिक्त टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (९ नोव्हेंबर) पुष्टी करताना ही माहिती दिली आहे.
इंग्लड संघाला पुढीलवर्षी पाकिस्तान दौऱ्यावर पाच टी२० सामनेही खेळणार होते. पण आता इंग्लड संघ आणखी दोन टी२० सामनेही खेळणार आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषत २०२२ नंतर पुन्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करेल आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
इंग्लंडचा संघ २००५ नंतर प्रथमच गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार होता, तर त्यांचा महिला संघही प्रथमच येथे दौरा करणार होता. पण नंतर ईसीबीने सुरक्षेचे कारण सांगून दौरा रद्द केला होता. इंग्लंडच्या या निर्णयावर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
यानंतर, ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी पाकिस्तानला भेट दिली आणि पीसीबीसोबतचे संबंध सुधारण्यासाठी मंगळवारी (९ नोव्हेंबर) रमीझ राजा यांची भेट घेतली आणि दोन अतिरिक्त टी-२० सामने खेळण्याचेही मान्य केले.
ईसीबीच्या निर्णयाचे स्वागत करताना पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले, ‘ईसीबीने येथे येऊन आपले मोठे मन दाखवले आहे, त्यासाठी मी टॉम आणि मार्टिन यांचा आभारी आहे. या गोष्टींचा खूप सकारात्मक परिणाम पाकिस्तान क्रिकेटवर होणार आहे. २०२२ मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन अतिरिक्त टी-२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडने वचनबद्धता दाखवली आहे, याबद्दल आम्ही उत्साहित आहोत. पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी येणारे संघ पाकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. त्यामुळे २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब असेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान लढतीने केला मोठा रेकॉर्ड; तब्बल ‘एवढ्या’ लोकांनी पाहिला सामना
रहाणेला डावलून रोहितला मिळणार न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत नेतृत्वाची संधी? वाचा सविस्तर