वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड आमनेसामने आलेले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवले . भारतीय गोलंदाजांनी केवळ 230 धावांचा बचाव करताना 100 धावांनी विजय मिळवून दिला. या पराभवासह इंग्लंडचा संघ विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला. त्यानंतर बोलताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा अत्यंत निराश दिसला.
उपांत्य फेरीत जाण्यासाठी थोडीफार संधी शिल्लक असल्याने इंग्लंडला या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र, गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरल्यामुळे त्यांना मोठा पराभव पाहावा लागला. त्यानंतर बोलताना इंग्लंडचा कर्णधार बटलर म्हणाला,
“आम्ही खूप जास्त निराश आहोत. पहिल्या डावानंतर आम्हाला आशा निर्माण झाली होती की आज आपण जिंकू शकतो. मात्र, फलंदाजांनी हवी तशी कामगिरी न केल्याने आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पुढील चॅम्पियन ट्रॉफीचे समीकरण आमच्या नक्कीच लक्षात आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 87 व सूर्यकुमार यादवच्या 49 धावांच्या जोरावर 229 अशी सन्मानजनक धावसंख्या उभी केली होती. या धावांचा बचाव करताना मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी पहिल्या दहा षटकात केवळ 40 धावांमध्ये इंग्लंडच्या चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखवून विजयाचा मार्ग खुला केला होता. त्यांना कुलदीप व जडेजा यांनी योग्य साथ दिली. शमीने चार तर बुमराहने तीन बळी घेत भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. यासह भारताने 100 धावांनी विजय साजरा केला.
(England Skipper Jos Buttler Speaks After Loss Against India In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया