सध्या इंग्लंड क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू निवृत्ती घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, अष्टपैलू मोईन अली व आक्रमक फलंदाज ऍलेक्स हेल्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. असे असतानाच इंग्लंडची महिला फिरकीपटू ऍलेक्स हार्टली हिने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला.
Calling time ????
Cricket World Cup 2017 winner Alex Hartley has announced her retirement from professional cricket.
More ????https://t.co/Za2Q4FkiiH
— ICC (@ICC) August 23, 2023
हार्टली हिने सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. आपल्याला मिळालेल्या संधीसाठी आपण क्रिकेट बोर्डाचे व देशाचे ऋणी राहू असे तिने म्हटले. 2017 मध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाची ती प्रमुख सदस्य होती. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने दोन बळी मिळवत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले होते. तिने इंग्लंडसाठी वनडे व टी20 क्रिकेटमध्ये मिळून 32 सामने खेळणे. सध्या सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये ती अखेरच्या वेळी खेळताना दिसणार आहे.
(England Spinner Alex Hartley Annouced Retirement From All Forms Of Cricket)
हेही वाचा-
आयर्लंड दौरा गाजवत असलेल्या बुमराह-प्रसिद्धविषयी भारतीय प्रशिक्षकाचे विधान; म्हणाला, ‘विश्वचषकापूर्वी…’
शंभर चेंडूंच्या लीगमध्ये फलंदाज बनला रिंकू सिंग; 5 चेंडूत ठोकले 5 जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ






