इंग्लंडमध्ये द हंड्रेड 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हॅरी ब्रूक द हंड्रेड लीगच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्याने अवघ्या 42 चेंडूत 105 धावांचा पाऊस पाडला आहे. ब्रूकने फक्त बॅटमधून नाही, तर क्षेत्ररक्षणातूनही आपला जलवा दाखवला आहे. त्याने सीमारेषेजवळ शानदार क्षेत्ररक्षण करत फलंदाजाला झेलबाद केले. आता ब्रूकने पकडलेल्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
हॅरी ब्रूकचे शानदार क्षेत्ररक्षण
रविवारी (दि. 20 ऑगस्ट) द हंड्रेड (The Hundred) लीगमधील 27वा सामना मँचेस्टर ओरिजिनल विरुद्ध नॉर्दर्न सुपरचार्जर्स (Manchester Originals vs Northern Superchargers) संघात पार पडला. या सामन्यात सुपरचार्जर्स संघाचा स्टार क्रिकेटपटू हॅरी ब्रूक (Harry Brook) याने सीमारेषेजवळ जोस बटलर (Jos Buttler) याचा झेल पकडण्यासाठी उडी मारली आणि चेंडू सीमारेषेच्या आत फेकण्यात यशस्वी ठरला. मात्र, यादरम्यान तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. त्यानंतर तो पुन्हा सीमारेषेच्या आत आला आणि चेंडू हवेत फेकला. यावेळी त्याचा संघसहकारी ऍडम होजने झेल पकडला. आता यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
And the tag team title goes to… #TheHundred #Cricket pic.twitter.com/HWsH5zMYS9
— FanCode (@FanCode) August 23, 2023
ब्रूकचे वेगवान शतक
या सामन्यातही ब्रूकला फलंदाजीतून खास कामगिरी करता आली नाही. त्याला फक्त 7 चेंडूत फक्त 2 धावा करता आल्या. मात्र, 22 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या स्पर्धेतील 30व्या सामन्यात ब्रूकने वेल्श फायर संघाविरुद्ध 42 चेंडूत 105 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली होती. त्याने आपल्या डावात 7 षटकार आणि 11 चौकार टोकले होते. मात्र, ही खेळी करूनही त्याच्या संंघाला 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
विश्वचषकाच्या संभावित संघातून बाहेर
इंग्लंडने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी संभावित संघ जाहीर केला. मात्र, या संघात ब्रूकला जागा मिळाली नाही. बेन स्टोक्स (Ben Stokes) याने विश्वचषकापूर्वी वनडे क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली होती. त्यामुळे ब्रूकला संघातून बाहेर बसावे लागले. (england star cricketer harry brook takes unbelievable catch in the hundred see video)
हेही वाचा-
एक चूक आणि पत्ता कट! आशिया चषक आणि वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची अग्निपरीक्षा, बीसीसीआयने आखला प्लॅन; वाचाच
क्रिकेटप्रेमींनो सज्ज व्हा! वर्ल्डकप 2023ची तिकीटे ‘या’ तारखेपासून करता येणार बुक, लगेच वाचा