---Advertisement---

सलामीवीरांची शतकी भागीदारी, रूट-बेयरस्टो जोडीचा चोप; चौथ्या दिवसाखेर भारतीय संघ बॅकफूटवर

On: सोमवार, जुलै 4, 2022 11:40 PM
Joe-Root-Jonny-Bairstow
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा (०४ जुलै) खेळ संपला आहे. या दिवसाखेर इंग्लंडने भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५७ षटकात ३ बाद २५९ धावा केल्या आहेत. इंग्लंडला आता विजयासाठी फक्त ११९ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून जो रूट आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी नाबाद परतली आहे. 

भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. ऍलेक्स लीस आणि झॅक क्राउले यांच्या पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. झॅक क्राउले २२ व्या षटकात वैयक्तिक ४६ धावांवर बाद झाल्याने त्यांची ही भागीदारी तुटली. भारताचा प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराहने क्राउलेला त्रिफळाचीत केले. त्यानंतर लगेचच बुमराहने ओली पोपला शून्यावर बाद केले.

त्यानंतर लीसही ५६ धावांची विस्फोटक खेळी केल्यानंतर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीच्या हातून धावबाद झाला. मात्र त्यानंतर जो रूट आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने मैदानावर तळ ठोकला. दोघांनीही बचावात्मक फलंदाजी करत चौथ्या दिवसाखेर चौथ्या विकेटसाठी अभेद्य दीडशतकी भागीदारी रचली आहे. दोघेही शतकाच्या जवळ असून रूट नाबाद ७६ धावांवर खेळत आहे. त्याने ९ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या आहेत. तसेच बेयरस्टो १ षटकार आणि ८ चौकारांसह ७२ धावांवर नाबाद आहे.

या डावात भारताकडून फक्त एकटा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २ विकेट्स घेऊ शकला आहे. इतर गोलंदाजांना अद्याप एकही विकेट मिळालेली नाही.

तत्पूर्वी दुसऱ्या डावात भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या जोडींनी चिवट झुंज दिली होती. पुजारा १६८ चेंडू खेळताना ६६ धावा करून बाद झाला होता. तर पहिल्या डावातील शतकवीर रिषभ पंतने ८६ चेंडूत ५७ धावा जोडल्या होत्या. मात्र या दोघांव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज विशेष योगदान देऊ शकला न शकल्याने भारताचा संघ २४५ धावांवरच गुंडाळला गेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ऍलेक्स लीसच्या विकेटनंतर दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप, जल्लोष पाहून अंगात संचारेल उर्जा!!

‘म्हारी छोरींया क्या छोरे से कम है’! यस्तिकाने साधली संधी, श्रीलंकन फलंदाजाला केले ‘धोनी स्टाईल’ रनआऊट

शतकानंतर अर्धशतक, रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध जाळ अन् धूर संगठच काढला; थेट अव्वलस्थानी पोहोचला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---