---Advertisement---

तब्बल 17 वर्षांनी रंगणार इंग्लंड-पाकिस्तान कसोटीचा थरार; स्टोक्स सेना पाकिस्तानमध्ये दाखल

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 5:00 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे.‌ टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर आता पाकिस्तान संघ कसोटीत विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे यजमानपद भूषवेल. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ पाकिस्तान येथे पोहोचला असून, मोठ्या सुरक्षेत त्यांचे पाकिस्तानात स्वागत करण्यात आले.

 

उभय संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.‌ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असलेल्या या मालिकेतील पहिला सामना 1 ते 5 डिसेंबर दरम्यान रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत मुलतान येथे होईल. तर, अखेरचा सामना 17 ते 21 डिसेंबर यादरम्यान कराचे येथे खेळला जाईल.

पाकिस्तान संघ तब्बल 17 वर्षानंतर आपल्या मायदेशात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडने 2005 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी पाकिस्तानला ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकण्यात यश आले होते. सध्या पाकिस्तान संघ जागतिक कसोटी क्रमवारीत पाचव्या तर, इंग्लंड सातव्या स्थानी विराजमान आहे. बेन स्टोक्स याने इंग्लंड संघाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून, इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली असून, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मनसुबा त्यांचा असेल.

इंग्लंड संघाचा पाकिस्तानमधील आजवरचा इतिहास पाहिल्यास त्यांना येथे फारसे यश मिळाले नाही. त्यांनी आत्तापर्यंत पाकिस्तानच्या भूमीवर 24 कसोटी सामने खेळले असून, त्यात केवळ दोन सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. चार सामने निर्णय राहिले असून, इतर अठरा सामन्यांचा निकाल लागला नाही.

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ-

बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, जो रूट, जेम्स अँडरसन, हॅरी ब्रूक, झॅक क्राऊली, बेन डकेट, विल जॅक्स, कीटन जेनिंग्स, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, मार्क वुड .

(England Team Reached Pakistan For Test Series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा! वनडे ओपनर म्हणून ‘मोठ्या’ विक्रमात सचिन-रोहित अन् धवनलाही पछाडलं
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---