---Advertisement---

इंग्लंडच्या कर्णधाराचं अनोखं शतक, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असं प्रथमच घडलं!

On: शनिवार, सप्टेंबर 7, 2024 8:59 AM
---Advertisement---

इंग्लंडचा कर्णधार ओली पोपनं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शतक झळकावून मोठा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला!

ओली पोपचं हे कसोटी क्रिकेटमधील 7वं शतक आहे. विशेष म्हणजे, त्यानं ही सातही शतकं वेगवेगळ्या संघांविरुद्ध झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिली 7 शतकं 7 वेगवेगळ्या संघांविरुद्ध ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरलाय. पोपनं आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, भारत, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेविरुद्ध शतकं ठोकली. त्याला अद्याप ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्ध शतक झळकावता आलेलं नाही.

ओली पोपनं जानेवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीतील पहिलं शतक झळकावलं होतं. त्यानं नाबाद 135 धावांची खेळी खेळली होती. 205 ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे, जी त्यानं जून 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळली होती.

ऑली पोपनं श्रीलंकेविरुद्ध 102 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडच्या कर्णधाराचं दुसरं सर्वात जलद शतक आहे. या यादीत माजी कर्णधार ग्रॅहम गूच पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1990 मध्ये भारताविरुद्ध 95 चेंडूत 100 धावांचा पल्ला गाठला होता.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट गमावून 221 धावा केल्या होत्या. ओली पोप 103 धावा करून क्रीजवर आहे. त्याच्यासोबत हॅरी ब्रूक 8 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे सामना केवळ 44.1 षटकांचाच झाला. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारानं दोन बळी घेतले. पोपशिवाय बेन डकेटनं इंग्लंडसाठी 86 धावांची शानदार खेळी खेळली. पहिल्या डावात जो रुट काही कमाल दाखवू शकला नाही.

हेही वाचा – 

भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी पंत सज्ज, दुलीप ट्रॉफीत यष्टीमागे दाखवली चपळता
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?
“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---