१ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे.
या मलिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १३ सदस्सीय इंग्लंड संघाची घोषणा काल गुरुवारी (23 जुलै) करण्यात आली.
सध्या इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरु असल्याने फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१६ नंतर प्रथमच आदिल रशिदला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे आदिल रशिदचा या १३ सदस्सीय इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.
तर या वर्षाच्या सुरवातीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या अॅशेस कसोटी मालिकेनंतर अष्टपैलू मोइन अलीचे देखील पुनरागमन झाले आहे.
त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जिमी पोर्टरचा प्रथमच इंग्लंड कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
असा आहे पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ-
जो रुट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, केटॉन जेनिंग्स, डेव्हीड मालन, जॉनी बेअस्ट्रो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोइन अली, जोस बटलर, आदिल रशिद, सॅम करन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅंडरसन, जिमी पोर्टर.
महत्त्वाच्या बातम्या-
-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’
-विश्वचषकानंतर ‘स्टेन गन’ थंडावणार