काही दिवसांपूर्वी भारताचा मोठा ऑस्ट्रेलिया दौरा संपला. हा कठिण दौरा भारतीय संघाने धैर्याने आणि अनेक संकटांचा सामना करत यशस्वी करुन दाखवला. आता भारतीय संघ मायदेशी परतला असून आता भारतासमोर मायदेशात इंग्लंडचे आव्हान असणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील सामन्यांना शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरुवातीला ४ सामन्यांची कसोटी मालिका होईल. त्यानंतर ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. या एकूण १२ सामन्यांसाठी चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या ठिकाणची ३ स्टेडियम निश्चित करण्यात आले असून त्याठिकाणी दोन्ही संघासाठी जैव-सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे.
कसोटी मालिकेने होईल इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात –
कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होतील. त्यानंतर, उर्वरित दोन सामने नव्याने बांधण्यात आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवले जातील. मालिकेतील तिसरा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा होईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना ५ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तसेच तिसरा सामना सोडला तर पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल. तर तिसरा सामना दिवस-रात्र असल्याने दुपारी २.०० वाजता सुरु होईल.
टी२० मालिका अहमदाबादमध्ये, तर वनडे पुण्यात –
कसोटी मालिकेच्या समाप्तीनंतर अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी२० मालिका १२ मार्चपासून खेळवली जाईल. त्यानंतर, २३ मार्चपासून पुणे येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सर्व सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होतील. तर वनडे मालिकेतील पहिले दोन सामने दुपारी २.३० ला सुरु होतील आणि शेवटचा सामना सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.
इंग्लंडच्या या भारत दौऱ्याने जवळपास १ वर्षांनी भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होईल.
पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ –
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात नियमित कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा यांचे पुनरागमन होत आहे. तर अक्षर पटेल या फिरकीपटूला या संघात संधी मिळाली आहे. मात्र या संघातून पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. तसेच रविंद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी, हनुमा विहारी अशा काही प्रमुख खेळाडूंना दुखापतींमुळे या दोन सामन्यात खेळता येणार नाही.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदिप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.
नेट गोलंदाज – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार
राखीव खेळाडू – केएस भरत, अभिमन्यू इश्वरन, शहाबाज नदीम, राहुल चाहर, प्रियांक पांचाल
इंग्लंडचा भारत दौरा-
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना- ५-९ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई) वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा कसोटी सामना- १३-१७ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई) वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा कसोटी सामना- २४-२८ फेब्रुवारी २०२१ (अहमदाबाद) वेळ – दुपारी २.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
चौथा कसोटी सामना- ४-८ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
टी२० मालिका –
पहिला टी२० सामना- १२ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा टी२० सामना- १४ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा टी२० सामना- १६ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
चौथा टी२० सामना- १८ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
पाचवा टी२० सामना- २० मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना- २३ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – दुपारी २.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा वनडे सामना- २६ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – दुपारी २.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा वनडे सामना- २८ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ
अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू