---Advertisement---

Rajkot Test । दुसऱ्या दिवसाखेर भारताकडे मोठी आघाडी, सलामीवीराच्या शतकाने इंग्लंडची धावसंख्या 200+

Ben Duckett
---Advertisement---

राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ 238 धावांनी आघाडीवर आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्सच्या नुकसानावर 207 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडसाठी सलामीवीर बेन डकेट याने 131* धावांची वादळी खेळी केली. डकेटची बॅट चालल्यामुळे इंग्लंड दिसऱ्या दिवसाखेर चांगली धावसंख्या उभी करू शकला.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने एकूण 5 विकेट्स गमावल्या. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 5 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावा होती. दुसऱ्या दिवशी 445 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवशी कुलदीप यादव (4), रविंद्र जडेजा (111), रविचंद्रन अश्विन (37), ध्रुव जुरेल (46) आणि जसप्रीत बुमराह (26) यांनी विकेट्स गमावल्या. इंग्लंडसाठी मार्क वुडे पहिल्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेऊ शकला. रेहान अहमद याने दोन विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसन, टॉम हार्टली आणि जो रुट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घतेली.

दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंड संघ फलंदाजीला आला. शेवटच्या सत्रात त्यांच्या दोन महत्वपूर्ण विकेट्स भारतीय गोलंदाजांनी मिळवल्या. झॅक क्रॉली आणि ओली पोप या खेळाडूंनी अनुक्रमे रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिरजा यांनी तंबूत धाडले. क्रॉली वैयक्तिक 15, तर पोप 39 धावा करून मैदानाबाहेर गेले. दिवसाखेर बेन डकेत 133*, तर जो रुट 9* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत.

रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आपल्या 500 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला. अश्विन भारतासाठी 500 कसोटी विकेट्स घेणारा अनिल कुंबळे यांच्यानंतर केवळ दुसरा गोलंदाज आहे.

(England trail by 238 runs at the end of the second day of the Rajkot Test)

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

महत्वाच्या बातम्या – 
भारतीय खेळपट्टीवर ‘ही’ कामगिरी करणं सोप नाही! इंग्लिश सलामीवराचं शतक ठरलं असाधारण
Ranji Trophy : भारतीय कसोटी संघात स्थान न मिळाल्यामुळे ‘या’ खेळाडूने रणजी ट्रॉफी दरम्यान घेतली निवृत्ती!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---