इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका १-१ अशा बरोबरीत समाप्त झाली. मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ न शकल्याने मालिका बरोबरीत राहिली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज रॅसी वॅन डर डसेनला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
The third ODI has been abandoned.
The ODI series finishes 1-1.
🏴 #ENGvSA 🇿🇦 pic.twitter.com/buk4TPmqXT
— England Cricket (@englandcricket) July 24, 2022
भारताविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघ विजयाच्या इराद्याने या मालिकेत उतरला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी व गोलंदाजांनी डरहॅम येथील या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत यजमान संघाचा दणदणीत पराभव केला. हा सामना इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या वनडे कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. या सामन्यात डसेनने शतकी तर एडेन मार्करमने अर्धशतकी खेळी केली होती.
दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंड संघाने पुनरागमन केले. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही त्यांची फलंदाजी ढेपाळली. दक्षिण आफ्रिकेच्य गोलंदाजांपुढे इंग्लंडचा संघ अवघ्या २०१ धावांवर सर्वबाद झाला. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी कसून मारा करत पाहुण्या संघाला अवघ्या ८३ धावांमध्ये गारद केले. यासह त्यांनी मालिका बरोबरीत आणली होती.
हेडिंग्ले येथील तिसऱ्या व निर्णायक सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या अशाने मैदानावर उतरले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने सार्थ ठरवला. दुसरा सलामीवीर मलान लवकर बाद झाल्यानंतर त्याने ७३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मार्करमसह तो संघाची धावसंख्या वाढवू लागला. मात्र, त्याचवेळी पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला. पावसामुळे बराच वेळ खेळ होऊ न शकल्याने शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. सामना थांबवला गेला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २७.४ षटकात २ बाद १५९ झाली होती. डी कॉक ९२ तर मार्करम २४ धावांवर नाबाद राहिला. यासह इंग्लंडचा नवनियुक्त कर्णधार जोस बटलर याला आपल्या नेतृत्वात मालिका जिंकण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा
WIvIND: वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; आवेश खानचे वनडे पदार्पण
पहिल्या दिवशीच पाकिस्तान विरुद्ध फर्नांडो, चंडीमलचा ड्रीम फॉर्म कायम; पाकिस्तान संकटात