---Advertisement---

ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!

On: मंगळवार, सप्टेंबर 8, 2020 12:02 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपला संघ सहकारी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला मर्यादित षटकांत देशाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी येथील एज बाऊल मैदानावर झालेल्या दुसर्‍या टी -20 सामन्यात, जोस बटलरने 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 77 धावा फटकावल्या.  बटलरच्या खेळीमुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने दिलेले 158 धावांचे लक्ष्य गाठता आले.  सात चेंडू आणि चार गडी राखून विजय मिळवला. यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

इंग्लंडचा माजी क्रिकेटर नील फेयरब्रदरने लिहिले की, “ज्या वेगाने बटलरने फलंदाजी केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या संघाला विजय मिळवून दिला, एक फलंदाज ज्या समजुतदारीने आणि कौशल्याने जबरदस्त फलंदाजी केली ते शानदार आहे.”

https://twitter.com/Harv366/status/1302649188933566464

ब्रॉडने यावर रिट्वीट करत लिहिले की, ‘व्हाइट बॉल चेंडू सर्वोत्कृष्ट खेळणारा इंग्लंडचा खेळाडू जोस बटलरने पुन्हा एकदा हे सिद्ध करुन दाखविले आहे.’

https://twitter.com/StuartBroad8/status/1302651681860128768

बटलरनेही पहिल्या टी -20 सामन्यात 44 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने हा सामना दोन धावांनी जिंकला होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनेही बटलरने सामना जिंकून देण्याच्या क्षमतेचे कौतुक केले आहे.

स्टार्कने सामन्यानंतर सांगितले की, “जेव्हा तुम्ही कुणाला शेवटच्या दोन सामन्यात सलग खेळताना पाहिले, तेव्हा तो निश्चितच लहान क्रिकेट प्रकारातला एक सामर्थ्यवान खेळाडू आहे. उद्या एक संघ म्हणून गप्पा मारायच्या आहेत. ”

मंगळवारी साउथॅम्प्टनच्या एज एज बाऊल स्टेडियमवर उभय देशांमधील तिसरा टी -20 सामना खेळला जाईल. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---