मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने इंग्लंडचे पाच गडी बाद करत विश्वविक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये पाच बळी मिळवणार कुलदीप पहिला लेफ्ट आर्म स्पिनर ठरला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या पाच षटकातच धावफलकावर ५० धावा लावत चांगली सुरवात केली होती.
कुलदीपने १२ व्या षटकात अॅलेक्स हेल्स तर १४ व्या षटकात इयोन मॉर्गन, जॉनी बेअस्ट्रो आणि जो रुटला बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
११ षटकात १ बाद ९५ अशी धावसंख्या असलेला इंग्लंड संघची १४ षटकात ५ बाद १०९ अशी झाली.
त्यानंतर १८ व्या षटकात अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉस बटलरला ६९ धावांवर बाद करत कुलदीप यादवने इतिहास घडवला.
कुलदीपने ४ षटकात २४ धावा देत पाच बळी मिळवत टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
-अखेर कर्णधार-उपकर्णधाराच्या रेसमध्ये विराटचा रोहितवर विजय
-अखेर साहेबांची सुसाट एक्सप्रेस टीम इंडियाने रोखली!