नॉटिंघम येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. आता भारताला लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घ्यायची आहे.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (12 ऑगस्ट) पासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यावर पावसाचा अंदाज नसला तरीही, शुक्रवारी (13 ऑगस्ट) दुसऱ्या दिवशी ढग येऊ शकतात. जाणून घेऊयात लॉर्ड्सवर पाच दिवसांची हवामान स्थिती नेमकी कशी असणार आहे.
It concludes as a draw at Trent Bridge 🤝
All eyes now at Lord's for the Second Test beginning on Thursday 🙌#LoveLords | #ENGvIND pic.twitter.com/Js6PFpEjuz
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 8, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test) लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. नॉटिंघममधील कसोटी सामन्यात पाऊस आणि खराब हवामानाने दोन्ही संघांच्या खेळाडूंनाच नव्हे तर चाहत्यांना देखील त्रास दिला. अखेर सामन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवशी एकही चेंडू न टाकता आल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे आता लॉर्डसवर हवामान कसे असेल हे पाहावे लागेल.
UPDATE: Play has been abandoned. ☹️
The first #ENGvIND Test at Trent Bridge ends in a draw.
We will see you at Lord's for the second Test, starting on August 12. #TeamIndia
Scorecard 👉 https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/k9G7t1WiaB
— BCCI (@BCCI) August 8, 2021
हेही वाचा – इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये, ‘हे’ ४ महारथी ठरु शकतात मॅचविनर
पहिली बाब म्हणजे, नॉटिंघमहून लंडनला पोहोचण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हवामान खूप भिन्न आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस पर्यंत राहू शकते. त्यामुळे पावसाची शक्यता नाही.
यानंतर, शुक्रवार (13 ऑगस्ट) रोजी तापमान सामन्याच्या पहिल्या दिवशी सारखेच राहील. दुसऱ्या दिवशी हवामान चांगले असेल. परंतू, या दिवशी सामन्यावर काळे ढग घोंगावू शकतात.
Hello 👋 Lord's, we're here #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/JjaFL82Qnq
— BCCI (@BCCI) August 10, 2021
शनिवारी (14 ऑगस्ट) म्हणजेच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी थोडी उष्णता असू शकते. तर, रविवार 15 ऑगस्ट रोजी हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. तसेच पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी (16 ऑगस्ट) रोजी हवामान कोरडे राहणार असल्याने शेवटच्या दिवशीही पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत.
एकंदरीत लॉर्ड्सवर कसोटी सामन्याच्या पाचही दिवसांचा खेळ होणे अपेक्षित असून चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अधिक वाचा –
- लॉर्ड्स कसोटीसाठी विराट सेना सज्ज! बीसीसीआयने शेअर केली छायाचित्रे
- जसप्रीत बुमराहचे ‘ते’ गूढ ट्विट होतेय व्हायरल