---Advertisement---

ENG vs NZ | इंग्लंडला मोठा झटका, शेवटच्या कसोटीतून दिग्गज गोलंदाजाची माघार

England-Test
---Advertisement---

न्यूझीलंडचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना अजून बाकी आहे. पण या शेवटच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका लागला आहे. दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण तिसऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.

माध्यमांतील माहितीनुसार जेम्स अँडरसन (James Anderson) पायाच्या दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३९ वर्षीय अँडरसनला पायाला दुखापत झाली आहे. याच कारणास्तव त्याला विश्रांती करावी लागेल. अशात न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता नाहीये. आगामी काळात त्याचे वेळापत्रक देखील व्यस्त आहे. यामध्ये अँडरसनला भारताविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना देखील खेळायचा आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ Test Series) यांच्यातील हा शेवटचा सामना २३ जूनपासून लीड्समध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत २-० अशा आघाडीवर आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, लीड्स कसोटी सामन्यासाठी जेव्हा प्लेइंग इलेव्हन निवडली जाईल, तेव्हा अँडरसनच्या जागी त्याचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडच्या नावाच विचार केला जाईल.

मालिकेतील शेवटच्या सामन्यात अँडरसने अनुपस्थितीत असणे इंग्लंडचा मोठा झटका मानला जात आहे, कारण तो या मालिकेत इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात मिळून त्याने एकूण ११ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यातील ६, तर दुसऱ्या सामन्यातील ५ विकेट्सचा समावेश आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अँडरसन जोरदार पुनरागमन करू शकला. संघ व्यवस्थापनाने त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले होते, पण न्यूझीलंडविरुद्ध त्याने पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने स्वतःच्या नावापुढे एक मोठा विक्रम देखील केला. अँडरसन कसोटी क्रिकेटमधील पहिला वेगवान गोलंदाज ठरला, ज्याने या प्रकारात ६५० विकेट्स पूर्ण केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘गुजरात टायटन्सचा ‘हा’ खेळाडू विश्वचषकात खेळण्यासाठी योग्य नाही,’ आशीष नेहराने केली भविष्यवाणी

‘त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी निवडले आहे, पण खेळण्याची संधी मिळणार नाही’, राहुल त्रिपाठी बद्दल माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

भारताचं नशीबं गंडलयं राव! पुन्हा एकदा टॉस जिंकत आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---