विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला प्रारंभ झाला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघाकडून डेवॉन कॉनवेने जोरदार सुरुवात करत शतक झळकावले आहे. तर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन या सामन्यात फ्लॉप ठरला.
न्यूझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज डेवॉन कॉनवे हा चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन हा अवघ्या १३ धावा करत माघारी परतला आहे. लंच ब्रेक झाल्यानंतर, जेम्स अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर केन विलियम्सनने उशिरा शॉट खेळला होता. त्यामुळे चेंडू, बॅटचा कड घेत थेट स्टंपला जाऊन धडकला होता.
केन विलियम्सनला, इंग्लंडमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. ही भारतीय संघासाठी दिलासादायक बाब असू शकते. केन विलियम्सन हा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी असला तरी ही, इंग्लंडमध्ये त्याची फलंदाजी सरासरी २८.८८ आहे. त्याने इंग्लंडमध्ये खेळलेल्या एकूण ९ डावात २६० धावा केल्या आहेत. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ, केन विलियम्सनला लवकर माघारी धाडण्याच्या प्रयत्नात असेल.
YESSSS @jimmy9 with a huge wicket! 🐐
Scorecard & Videos: https://t.co/7Bh6Sa3TPf#ENGvNZ pic.twitter.com/2Hke3L8Sqv
— England Cricket (@englandcricket) June 2, 2021
मायदेशात हिट तर परदेशात फ्लॉप
केन विलियम्सन हा मॉडर्न डे क्रिकेटमध्ये खेळाच्या तीनही प्रकारात टॉप फलंदाजांपैकी एक आहे. परंतु त्याची फलंदाजी सरासरी इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत खूप कमी आहे. त्याने भारतात ३५.४६, दक्षिण आफ्रिकेत २१.१६ आणि श्रीलंकेत अवघ्या २६.७१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्टइंडिजमध्ये चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ८३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ५४.३ च्या सरासरीने ७११५ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने ३२ अर्धशतक आणि २४ शतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
असं कोण धावबाद होतं भावा!! पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ
इंग्लंडमध्ये कमी सराव मिळाल्याचा परिणाम होणार? ‘कर्णधार’ कोहलीने दिले ‘हे’ उत्तर
कॅरेबियन बेटावर जन्मलेला पण भारताकडून खेळताना ‘चपळ क्षेत्ररक्षक’ म्हणून नावारुपाला आलेला रॉबिन सिंग