वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केल्यानंतर आता इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आज (५ ऑगस्ट) मॅनचेस्टर येथे या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे. England Vs Pakistan Test Series Begins Today
या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पाकिस्तान संघातील गोलंदाजांची फळी मजबूत दिसत आहे. त्यामुळे म्हटले जात आहे की, पाकिस्तान संघ इंग्लंडला वेस्ट इंडिजपेक्षा आव्हानात्मक ठरू शकतो. असे असले तरी, इंग्लंड हा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्येही मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाकडे मिस्बाह उल हक यांच्यासारखे मुख्य प्रशिक्षक उपलब्ध आहेत. तसेच, फलंदाजी प्रशिक्षक यूनिस खान आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनिस यांच्यासारखे महान क्रिकेटपटूंनी संघाला प्रशिक्षण दिले आहे. असे म्हटले जात आहे की, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघ अनुभवी क्रिकेटपटूंना जास्त प्राधान्य देणार आहे. त्यामुळे संघातील १६ सदस्यांमध्ये सरफराज अहमदला स्थान देण्यात आले. तसेच, संघातील ११ खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानला निवडण्यात आले आहे.
मंगळवारी पाकिस्तानने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार अजहर अली याचे म्हणणे आहे की, “त्याच्या संघाने या मालिकेसाठी खूप मेहनत केली आहे. त्यांची जबरदस्त तयारीदेखील झाली आहे. सर्व खेळाडू कोरोना व्हायरसनंतर पाकिस्तान संघाच्या या पहिल्या सामन्यांत खेळण्यासाठी उत्सुक आहेत.”
तर, दूसरीकडे इंग्लंडचा कसोटी संघही मजबूत असल्याचे दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेप्रमाणे पाकिस्तानविरुद्धही बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर दमदार प्रदर्शन करण्यास सज्ज असतील. क्रिस वोक्सनेही त्याच्या वेगाने आणि स्विंगने सर्वांना प्रभावित केले होते. वोक्ससह ऑली पॉप आणि जोस बटलर यांच्या प्रदर्शनावरही सर्वांचे लक्ष असेल. सलामीवीर फलंदाज डोम सिब्ली पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कशाप्रकारे सामना करेल, हे पाहणेदेखील रोमांचक ठरेल.
मात्र, पावसामुळे कसोटी मालिकेतील पहिल्या २ दिवसांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण सुरुवातीच्या २ दिवसांत मॅनचेस्टर येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. पावसामुळे इंग्लंड संघानेदेखील इनडोअर सराव केला आहे. शुक्रवारपासून हवामान ठीक होण्याचा अंदाज आहे.
१६ सदस्यीय पाकिस्तान संघ –
अजहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफिक, फवाद आलम, इंजमाम उल हक, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहिद आफ्रिदी, शान मसूद, सोहोल खान आणि यासिर खान.
१६ सदस्यीय इंग्लंड संघ –
जो रुट (कर्णधार), जेम्स अंडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झाक क्राउली, ऑली पॉप, सॅम करन, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, मार्क वूड.
पर्यायी – जेम्स ब्रासी, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर
धोनीने सीएसकेला सांगितलं होतं; त्या खेळाडूला घेऊ नका, तो टीमची वाट लावेल
आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार
ट्रेंडिंग लेख –
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक
डोंगराएवढे लक्ष आयर्लंडने पार करत इंग्लंडला चारली पराभवाची धुळ, २०११ विश्वचषकाची झाली आठवण
धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब