मुंबई । इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून (२१ ऑगस्ट) साऊथॅंम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी इंग्लंडने आपला पहिल्या डाव 8 बाद 583 धावांवर घोषित केला. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 3 बाद 24 धावा केल्या आहेत. दिवसांचा खेळ संपताना कर्णधार अझर अली नाबाद 4 धावांवर आहे.
पाकिस्तान संघाच्या पहिल्या ३ विकेट्स पडल्या असून या विकेट्स वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने घेतल्या आहेत. त्याने प्रथम शान मसूदला 4 धावांवर पायचीत केले. यानंतर अबिद अली (1) याला डोम सिब्लीकडून झेलबाद केले, तर बाबर आझमला (11) धावांवर पायचीत करत तिसरी विकेट घेतली.
क्रॉलीने कारकिर्दीतील पहिले दुहेरी शतक ठोकले
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून झॅक क्राऊलेने सर्वाधिक 267 आणि जोस बटलरने 152 धावा केल्या. क्राऊलेचे हे कसोटी कारकीर्दीतील पहिलेच दुहेरी शतक आहे, तर बटलरचे हे दुसरे शतक आहे. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदी, यासिर शाह आणि फवाद आलम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या तसेच नसीम शाह आणि असद शफीकने प्रत्येकी १ विकेट घेतली.
क्राऊलेने 171 चेंडूत शतक ठोकले
22 वर्षीय क्रॉलीने 171 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. 2000 सालानंतर झॅक क्राऊलेपूर्वी लहान वयात केवळ अॅलिस्टर कूक, ऑली पोप, जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी पहिले शतक झळकावले आहे.
दोन्ही संघांची प्रतिष्ठा लागली पणाला
या सामन्यात दोन्ही संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण पाकिस्तानने दहा वर्षांपासून इंग्लंडकडून कसोटी मालिका गमावली नाही.
इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी कायम राखली आहे. इंग्लंड संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केले होते, तर दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. इंग्लंड संघ तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका 2-0 ने जिंकण्याचा, तर पाकिस्तान तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका 1-1अशी बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान पूर्ण करण्यात ‘या’ संघाला अपयश
-सुनिल नरेन एक्सप्रेस काही थांबेना, धडाकेबाज कामगिरी करत नाईट रायडर्सला दिला शानदार विजय
-जुना धोनी परतला, पहा कशामुळे चाहत्यांना दिसला जुना धोनी क्रिकेट मैदानावर
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ऍलन विल्किंंस
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…