मुंबई । कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून क्रिकेटच्या सर्वच मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. 8 जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने तेरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
13 सदस्यीय संघात फिरकीपटू मोईन अली, यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो यांना सामील करण्यात केले नाही .
इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूट पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याने त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा संघाची धुरा सांभाळणार आहे.
संघामध्ये वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड ,जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यासह अष्टपैलू ख्रिस बॉक्स याला देखील संघात स्थान दिले आहे.
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी डॉम बेस यांच्याकडे देण्यात आली आहे. जॅक लिच याला संधी देण्यात आली नाही.
सरावादरम्यान बेसने आपल्या गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले होते. अनुभवी खेळाडू मोईन अली याला संघात स्थान देण्यात आले नाही.
पहिला कसोटी सामना साऊथम्पटन येथे जैविक वातावरणात सुरू होणार आहे. कोरोना व्हायरसच्या सावटात होणार्या या मालिकेकडे क्रिकेट जगताचे लक्ष आहे. ही मालिका यशस्वी झाली तर इतर क्रिकेट बोर्डही क्रिकेट खेळण्यास सुरू करतील अशी आशा आहे.
इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), जाक क्रॉले, जो डेनली, ओली पोप, डॉम सिबले, क्रिस वोक्स, मार्क वुड.
राखीव खेळाडू : जेम्स ब्रेसी, सॅम करन, बेन फोक्स (यष्टिरक्षक), डॅन लारेंस, जैक लीच, साकिब महमूद, क्रेग ओवरटन, ओली रोबिनसन आणि ओली स्टोन.