मुंबई । कोरोना महामारीच्या सावटात इंग्लंड वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वेस्टइंडीज संघाला लंचमध्ये खाण्यास कोण कोणते खाद्यपदार्थ मिळतात हे दाखवण्यात आले आहे. यावेळी तोंडाला मास्क, हातात ग्लोज घातलेला शेफ लंचमध्ये काय आहे हे सांगत आहे.
वेस्ट इंडिज संघाला लंचमध्ये हनी रोस्टेड बटरनॉट स्क्वाश (Honey Roasted butternut squash), इटालियन सबनेमापायोर बीफ (Italian subnemarayor beef), चिकन अरबियाता (chicken Arrabiata), स्पाघेती (sphaghheti), स्वीट पोटॅटो (sweet potatoe), मॅक्सिकन मेडिटेरेनीन वेजिटेबल्स (Mexican-Mediterranean vegetables), गार्लिक ब्रेड्स (garlic breads) आणि सीजर सलाद (Caesar salad) यासह अनेक खमंग खाद्यपदार्थ आहेत.
Want to know what the #MenInMaroon had for lunch today? Check out the options provided here at The Ageas Bowl! 🍲🤤#MenInMaroon #WIReady 🏏🌴 pic.twitter.com/OCgM3RPU61
— Windies Cricket (@windiescricket) July 9, 2020
वेस्ट इंडीज संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. घातक गोलंदाजी केल्याने इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या 204 धावांवर आटोपला. यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी साकारली. जोस बटलरने 35 धावांची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने सामन्यात भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक इंग्लंडचे 6 गडी बाद झाले. शेनॉन गॅब्रियल याने 4 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.
INNINGS BREAK: Tea taken early, as the #MenInMaroon bowl out England for 204! 👏🏾🔥
A word from the skipper, who had figures of 20-6-42-6 🙌🏿#WIReady 🏏🌴 pic.twitter.com/n4o15D7mva
— Windies Cricket (@windiescricket) July 9, 2020
एक कर्णधार म्हणून खेळत असताना होल्डरने एका डावात पाचपेक्षा जास्त बळी टिपण्याचा पराक्रम सात वेळा केला. त्याने कर्टनी वॉल्श यांच्या विक्रमाची बरोबरी केली.