मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. इंग्लंडचा संघ काउंटी क्रिकेट संघाच्या काही प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत आहे. ग्लेन चॅपल, रिचर्ड डॉसन आणि मॅथ्यू वॉकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
हे तिघेजण अनुक्रमे लँकाशर, ग्लोसेसटरशर आणि केंट या संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. मंगळवारपासून हे तिघे संघासोबत काम करत आहेत. यापूर्वीच इंग्लंडचा संघ साउथम्पटन येथील एजियास बाउल मैदानवर गेल्या दोन आठवड्यांपासून सराव करतोय. यादरम्यान, खेळाडूंची विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे सर्व खेळाडूंची नियमित्त तपासणी देखील करण्यात येत आहे.
एक जुलै रोजी तीन दिवसीय सराव सामना होणार आहे. त्यानंतर पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. दुसरा आणि तिसरा सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या वेस्टइंडीजचा संघ याच मैदानावर सराव करत आहे.
निवडण्यात आलेल्या 30 जणांच्या संघात 8 नवे चेहरे आहेत. यातील साकीब महमूद लुईस ग्रेगरी आणि मॅट पार्किसन यांनी यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यासोबतच अनुभवी खेळाडू मोईन अली याचा देखील समावेश करण्यात आला आहे. मोईनने त्याचा शेवटचा सामना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामना खेळला होता.
सरावासाठी निवडण्यात आलेला इंग्लंडचा संघ
ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट, डोम सिबले, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, अमर विर्डी, क्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, सॅम कुरेन, जो डेनली, बेन फोक्स, लुईस ग्रेगरी, कीटोन जेनिंग्स, डॅन लॉरेंस, जॅक लीच, साकिब महमूद, क्रेग ओवरटन, जेमी ओवरटन, मॅथ्यू पार्किंसन, मोईन अली, जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेयरस्टो, डोमीनिक बेस, जेम्स ब्रेसी.