मुंबई । कोरोना विषाणूने जगभर थैमान घातला आहे. या कोरोनाच्या सावटातच क्रिकेटला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या काही खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास नकार दिला असल्याची माहिती वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी दिली.
डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि किमो पॉल यांनी कौटुंबिक कारण पुढे करत इंग्लंड दौऱ्यास जाण्यास नकार दिला आहे. कोरोनामुळे ग्रेव म्हणाले की, ” खेळाडूंनी दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. या पाठीमागेच कारण आम्ही समजू शकतो. त्यांच्या बाबतीत आम्ही सहानुभूती दाखवली आहे.”
“केमो पॉल आपल्या कुटुंबामध्ये कमवणारे एकमेव व्यक्ती आहेत. खरोखरच तो चिंतीत आहे. त्याला काही झालं तर त्याचा परिवाराचे कसे होणार? पॉलने बोर्डाला ई मेल करून या दौऱ्यात न जाण्याचे कारण कळविले आहे. त्याच्यासाठी अश्या कठीण परिस्थितीत निर्णय घेणे खूपच अवघड होते. तो वेस्ट इंडीजकडून खेळण्यास नेहमी उत्साहित असतो. पण आपल्या कुटुंबाला सोडून कोणत्याच दौऱ्यावर जाऊ इच्छित नाही.”
ब्रिटनमधली कोरोची गंभीर परिस्थिती पाहून ब्रावो देखील चिंतीत झाला आहे. तो आपल्या कुटुंबाला सोडून जाऊ इच्छित नाही. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2.70 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या 3 कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा 25 सदस्यीय संघ मंगळवारी इंग्लंडकडे रवाना होईल.
14 सदस्यीय वेस्टइंडीजचा संघ
जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, एनक्रुमा बोनर, क्रेग ब्रॅथवेट, शमारह ब्रूक्स, जॉन कॅपबेल, रेस्टन चेज, रकहीम कॉर्नवॉल, शेन डॉरिच, चेमार होल्डर, शाई होप, अलजारी जोसेफ, रेमंड रीफर, कीमर रोच.
राखीव खेळाडू
सुनील एंब्रिस, जोशुआ डसिल्वा, शॅनन गॅब्रियल, किओन बोर्डिंग, काइल मेयर्स, प्रेस्टोन मॅकस्वीन, मार्किनो मिंड्ले, शेन मूसेली, एंडरसन फिलिप, ओशाने थॉमस, जोमेल वॅरिकन.