पुरूष संघाचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघाकडे टी20 विश्वचषकाचा खास विक्रम करण्याची संधी आहे. असे झाले तर वेस्ट इंडिजच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तान जिंको वा इंग्लंड वेस्ट इंडिजच्या त्या रेकॉर्डची बरोबरी होणार हे निश्चित आहे.
टी20 विश्वचषकाचा पहिला विजेता भारत ठरला. त्यानंतर भारताला पुन्हा विजेतेपद मिळवता आले नाही. तसेच टी20 क्रिकेटच्या इतिहासात पाहिले तर वेस्ट इंडिज असा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद (2012 आणि 2016) जिंकले. दुसरीकडे भारताबरोबर पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे एक-एक वेळा चॅम्पियन ठरले आहेत. पाकिस्तानने 2009 तर इंग्लंडने 2010मध्ये टी20 विश्वचषक जिंकला.
आठव्या टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची सुरूवात चांगली नाही झाली. पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव स्विकारावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने धक्का दिला. दुसऱ्या पराभवानंतर तर त्यांचे टी20 विश्वचषकातून बाहेर जाणे पक्केच होते. त्यातच नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने त्यांना उपांत्य फेरीच्या आशा दिसू लागल्या आणि खेळाडूंनी कठोर मेहनत करत लागोपाठ तीन सामने जिंकले. उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला.
इंग्लंडने पहिल्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला, मात्र दुसऱ्या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या आयर्लंडकडून पराभव स्विकारावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे इंग्लंड अडचणीत आला होता. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा लागोपाठ पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात भारतावर 10 विकेट्सने मोठा विजय मिळवत धडाक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. West Indies won two t20 world cup, England win or Pakistan they will equal this record.
विशेष म्हणजे दोन्ही संघांनी त्या-त्या ग्रुपमध्ये गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघांना पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमी-फायनलमधील पराभवानंतर अशी होती टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील परिस्थिती
उमरान मलिक न्यूझीलंडमध्ये आपल्या वेगाने कहर करायला सज्ज, फिटनेस व्हिडिओ व्हायरल