लीड्स। मंगळवारी (17 जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
3 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे.
या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात 3 बदल करण्यात आले आहेत. दिनेश कार्तिकला केएल राहुल एेवजी 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली आहे. तसेच उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल ऐवजी शार्दुल ठाकुर आणि भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली आहे.
त्याबरोबरच इंग्लंडच्या 11 जणांच्या संघात दुखापतग्रस्त जेसन रॉयच्या ऐवजी जेम्स विन्सला घेण्यात आले आहे.
हा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर होणार आहे. या मैदानावर याआधी या दोन संघात आत्तापर्यंत 6 वनडे सामने झाले असुन यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश आले आहे, तर 4 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ:
भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), दिनेश कार्तिक, सुरेश रैना, एमएस धोनी, हर्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल.
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, जेम्स व्हिन्स, जो रूट, इयान मॉर्गन (कर्णधार) , बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, डेव्हिड विली, लिआम प्लंकेट, आदिल रशिद, मार्क वुड.
Here's the Playing XI for #ENGvIND pic.twitter.com/AlMQOMMMLs
— BCCI (@BCCI) July 17, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून जोकोविचच्या मुलाला पाहाता आली नाही विंबल्डनची फायनल!
–अजय देवगण आणि तुझे नाते काय? पोलार्डचा कृणाल पंड्याला प्रश्न