क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू डॅनी वाएट हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. डॅनीने याची माहिती तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. डॅनीने तिच्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या बामतीमुळे तिचे चाहते भलतेच आनंदात आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षावही करत आहेत.
डॅनी वाएट (Danni Wyatt) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये डॅनीने पार्टनर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत डॅनीच्या पार्टनरच्या हातात अंगठीदेखील दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत डॅनीने लिहिले आहे की, “तू सदैव माझी.”
https://www.instagram.com/p/CpSY5pUo7sf/?hl=en
डॅनीच्या या पोस्टला 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सही आल्या आहेत. या पोस्टवर 2017सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या मोना मेश्राम हिनेदेखील कमेंट केली. तिने म्हटले की, “व्वा, अभिनंदन. शानदार इनिंग्जचा एकत्र आनंद लुटा.” ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू अलाना किंग हिने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही दोघीही शानदार आहात. अभिनंदन.” याव्यतिरिक्त एका युजरने लिहिले की, “तुम्ही सर्वोत्तम महिला आहात. तसेच, प्रत्येक आनंदासाठी पात्र आहात. तुमचे अभिनंदन.” अशाप्रकारे चाहते आणि क्रीडा जगतातील व्यक्ती त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. (England women’s cricketer Danni Wyatt gets engaged)
डॅनीची कारकीर्द
डॅनी हिच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने मार्च 2010 साली भारतीय महिलांविरुद्ध वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते. तिने इंग्लंडकडून 102 वनडे सामने आणि 143 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. वनडेत तिने 23.68च्या सरासरीने 1776 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचाही समावेश आहे. तसेच, टी20त तिने 21.53च्या सरासरीने 2369 धावा केल्या आहेत. यामध्येही 2 शतकांचा समावेस आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजीत तिने वनडेत 27 विकेट्स आणि टी20त 46 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन
भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हमधील ‘या’ पठ्ठ्याला सोडून लायनने सर्वांची केलीय शिकार, यादी पाहाच