इंग्लंड आणि पाकिस्तान संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडला. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली असली तरी, या संघात असे पाच खेळाडू नव्हते जे या संघासाठी प्रत्येक वेळी धावून आले आहेत.
इंग्लंडने 2019 मध्ये मायदेशात पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकला होता. त्या संघात सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज म्हणून जोफ्रा आर्चर समोर आला होता. आर्चर दुखापतीमुळे मागील जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आर्चर तंदुरुस्त असता तर नक्कीच त्याचा या संघात समावेश केला गेला असता.
या विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना मोठा धक्का बसला होता. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो हा गोल्फ खेळत असताना दुखापतग्रस्त होत विश्वचषकातून बाहेर पडला. बेअरस्टो यावर्षीच्या ज्या फॉर्ममध्ये होता ते पाहता त्याने कर्णधार जोस बटलरसह नक्कीच संघासाठी सलामी दिली असती. बेअरस्टोच्या जागी आलेल्या ऍलेक्स हेल्स याने मात्र संघाला त्याची उणीव भासू दिली नाही.
इंग्लंड संघ विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर संघाला आणखी एक हादरा बसलेला. टी20 क्रमवारीत इंग्लंडसाठी सर्वोच्च क्रमांकावर असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज रिसे टोप्ली हा सराव सामन्यात दुखापतग्रस्त होत विश्वचषकाला मुकला. मात्र, तरीही इंग्लंडच्या सर्वच वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्याची कमतरता जाणून दिली नाही.
इंग्लंडने संपूर्ण साखळी फेरीत उत्कृष्ट खेळ दाखवत उपांत्य फेरीत मजल मारली होती. परंतु, भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्या आधीच त्यांना दोन मोठे दणके बसले. टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिला पाचमध्ये असणारा डेविड मलान व या विश्वचषकात सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा मार्क वूड यांना दुखापत झाली. परंतु, त्यांच्या जागी आलेल्या फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डन यांनी उपांत्य फेरी व अंतिम फेरीचा दबाव झेलत उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विश्वविजेते बनण्यात मदत केली.
(England Won T20 World Cup Without Archer Bairstow Wood Malan Topley)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके
सेमीफायलमधून बाहेर पडूनही भारत ‘या’ यादीत दुसऱ्या स्थानी, इंग्लंडने ट्रॉफी जिंकून पटकावला तिसरा क्रमांक