इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात रविवारी (१० जुलै) ट्रेंट ब्रिज येथे टी२० मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला. मात्र प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादव याने झंझावाती खेळी करत संघाला विजयाच्या नजीक पोहोचवले. तरीही शेवटी संघाच्या हाती निराशाच लागलीय भारतीय संघाने १७ धावांनी हा सामना गमावला. यासह इंग्लंडला टी२० मालिकेत व्हाईटवॉश देण्याची संधीही हुकली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावाच करू शकला.
भारताकडून सूर्यकुमार यादवने चिवट झुंज दिली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने शानदार शतक ठोकले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने ५५ चेंडूत ६ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने ११७ धावांंची कौतुकास्पद खेळी खेळली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला साध्या २० धावाही करता आल्या नाहीत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ११ धावांवर बाद झाले.
तसेच श्रेयस अय्यरने २३ चेंडूत २८ धावांची संथ खेळी केली. इतर फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाले. परिणामी भारतीय संघ २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावाच करू शकला.
https://twitter.com/BCCI/status/1546176195439517696?s=20&t=hbFncUmdSiaDtVM-682-Iw
तत्पूर्वी पहिल्या डावात इंग्लंडकडून डेविड मलानने सर्वाधिक धावा केल्या होत्या. सलामीवीरांच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर डेविड मलानने झंझावाती खेळी केली. त्याने ३९ चेंडूत १९७.४४ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना ७७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ६ चौकारही ठोकले. तसेच लियाम लिविंगस्टोननेही त्याचा रुद्रावतार दाखवला. २९ चेंडूंचा सामना करताना ४ खणखणीत षटकार मारताना त्याने नाबाद ४२ धावांची वादळी खेळी केली. या खेळींच्या जोरावर इंग्लंडचा संघ २१५ धावा फलकावर लावू शकला होता.
या डावात भारताकडून रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी किफायतशीर गोलंदाजी केली. त्यांनी दोघांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिकनेही एका विकेटचे योगदान दिले. मात्र तो भारतासाठी महागडा ठरला. त्याने आपल्या ४ षटकांदरम्यान ५६ धावा खर्च केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकापूर्वी आयसीसीने शेअर केला पंतचा खासम खास व्हिडिओ, कॅप्शनही आहे दमदार
उमरानच्या गतीला तोडच नाही..! इंग्लंडमध्येही फेकला भारताकडून सर्वात वेगवान चेंडू, स्पीड तर पाहा
जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी भिडणार भारतीय खेळाडू, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगणार थरार






