ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान (ENGvPAK) यांच्या दरम्यान खेळला गेला. मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
???? T O S S A L E R T ????
England win the toss and opt to field first ????#WeHaveWeWill | #T20WorldCup | #PAKvENG pic.twitter.com/UiCDwpgOiV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 13, 2022
आपले दुसरे टी20 विश्वचषक विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या या दोन्ही संघांनी आपल्या उपांत्य फेरीत खेळलेल्या संघाशी कोणतीही छेडछाड केली नाही. दोन्ही संघांनी आपला तोच संघ कायम ठेवला. इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वूड उपांत्य फेरीसह या सामन्यालाही मुकला. त्याची पायाची दुखापत अद्याप बरी न झाल्याने ख्रिस जॉर्डन याला पुन्हा एकदा संधी मिळाली.
दुसरीकडे मागील चार सामन्यांपासून अजिंक्य असलेल्या पाकिस्तानेही आपला उपांत्य फेरीतील संघ कायम ठेवला. चार प्रमुख वेगवान गोलंदाज व दोन अष्टपैलूंसह पाकिस्तानने या सामन्यात उतरण्याचा निर्णय घेतला.
एकवेळ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानने आपल्या अखेरच्या तीन साखळी सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंडला उपांत्य सामन्यात नमूद त्यांनी अंतिम फेरी गाठली. त्याचवेळी इंग्लंडने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ करत उपांत्य फेरी पर्यंतचा प्रवास केलेला. उपांत्य सामन्यात विजयाचे दावेदार असलेल्या भारतीय संघावर त्यांनी दहा गड्यांनी मोठा विजय मिळवत तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.
Our playing XI for the final ????#WeHaveWeWill | #T20WorldCup | #PAKvENG pic.twitter.com/6dFMjB7dgN
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 13, 2022
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, मोहम्मद हारिस, शादाब खान, इफ्तिकार अहमद, मोहम्मद नवाज, शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद वसिम व नसीम शाह
Let's do this ????
We win the toss and bowl first ⚪
Scorecard: https://t.co/voHGdI0Pb0#T20WorldCup | #ENGvPAK pic.twitter.com/r4vXunbbN6
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन-
जोस बटलर (कर्णधार), ऍलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, ख्रिस वोक्स.
(England Won Toss And Elect Field In T20 World Cup Final)






