कालपासून(22 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आज(23 ऑगस्ट) दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 67 धावांवरच अटोपला आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर नकोसा असा एक विक्रम झाला आहे.
लीड्समध्ये कसोटीत इंग्लंडने केलेली ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी 1907 मध्ये याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा संघ 76 धावांवर सर्वबाद झाला होता. या मैदानावरील ही कसोटीमधील आत्तापर्यंतची इंग्लंडने केलेली सर्वात निचांकी धावसंख्या होती. पण आज इंग्लंडने आज 67 धावांवर सर्वबाद होत या नकोसा विक्रमाला मोडला आहे.
या सामन्यात इंग्लंडकडून केवळ जो डेन्लीला दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्याने 12 धावा केल्या. मात्र अन्य एकाही फलंदाजाने दोन आकडी धावसंख्या पार केली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 179 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून डेव्हिड वॉर्नर(61) आणि मार्नस लॅब्युशानेने(74) अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्यात इंग्लंडला 67 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 112 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रहाणेने सांगितले अश्विनला ११ जणांच्या टीम इंडियात संधी न देण्यामागील कारण
–फिल्डिंग कोच म्हणून निवड न झाल्यानंतर जॉन्टी ऱ्होर्ड्सने दिली ही प्रतिक्रिया
–शास्त्रींना टक्कर देणारा उमेदवार आता कोहलीच्या आरसीबीची धूरा सांभाळणार