कालपासून(22 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. आज(23 ऑगस्ट) या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर शून्य धावेवर बाद झाला आहे. त्याला इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने पायचीत केले. वॉर्नरची कसोटीमध्ये आत्तापर्यंत ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद होण्याची ही 9 वी वेळ आहे.
त्यामुळे ब्रॉडने कसोटीत वॉर्नरला सर्वाधिकवेळा बाद करण्याच्या आर अश्विन आणि जेम्स अँडरसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसननेही वॉर्नरला कसोटीमध्ये प्रत्येकी 9 वेळा बाद केले आहे.
या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 67 धावांवर संपुष्टात आणला आहे. इंग्लंडकडून जो डेन्लीने सर्वाधिक 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 179 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून डेव्हिड वॉर्नर(61) आणि मार्नस लॅब्युशानेने(74) अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्यात इंग्लंडला 67 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 112 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–६७ धावावंर सर्वबाद होत इंग्लंडने मोडला ११२ वर्षांचा नकोसा विक्रम
–रहाणेने सांगितले अश्विनला ११ जणांच्या टीम इंडियात संधी न देण्यामागील कारण
–फिल्डिंग कोच म्हणून निवड न झाल्यानंतर जॉन्टी ऱ्होर्ड्सने दिली ही प्रतिक्रिया