---Advertisement---

स्टीव्ह स्मिथने रचला नवा जागतिक विक्रम, जो रुटला टाकले मागे

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2026 6:25 PM
---Advertisement---

स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे, त्याने जो रूटला मागे टाकत इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूने हा विक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी केला. यजमान संघाच्या पहिल्या डावात स्मिथने पहिला झेल कर्णधार टेंबा बावुमाचा घेतला, आणि डेव्हिडचा झेल घेतल्यानंतर त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 28 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टेंबा बावुमा बाद झाला, नॅथन लायनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने हा झेल टिपला. यानंतर 31 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्मिथने आणखी एक शानदार झेल घेतला, हा डेव्हिड बेडिंगहॅमचा होता, जो आपल्या अर्धशतकापासून 1 धावेने चुकला.

​बेडिंगहॅमचा झेल घेतल्यानंतर स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे, त्याने इंग्लंडच्या जो रूटला मागे सोडले आहे. स्मिथने कसोटीमध्ये आतापर्यंत 221 झेल टिपले आहेत. 221 झेळांसह जो रूट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

​ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 390 धावांवर संपला होता. मॅट रेनशॉने सर्वाधिक 190 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात विलेम मुल्डरने सर्वाधिक 4 बळी घेतले. मार्को जॅन्सेनने 3 आणि एनरिक नॉर्खियाने 2 बळी टिपले.

​दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सुरू आहे, वृत्त लिहिपर्यंत संघाने 188 धावा केल्या आहेत पण त्यांचे 6 गडी बाद झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने शानदार गोलंदाजी केली, सुरुवातीच्या 6 पैकी 3 बळी कमिन्सने घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---