भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) उभय संघांतील ही लढत सुरू होईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी तयारी करत आहेत. पहिल्या कसोटीत यजमान भारताला इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना सुरू होण्याआधी एक दिवस म्हणजेच गुरुवारी (1 फेब्रुवारी) इंग्लंडचा एक महत्वाचा खेळाडू संघातून बाहेर झाला.
इंग्लंडचा यशस्वी फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीये. कर्णधार बेन स्टोक्स याने दिलेल्या माहितीनुसार जॅक लीच याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. हैदराबाद कसोटी खेळताना ही दुखापत त्याला झाली होती. पण फिरकीपटूने दुखापत झाल्यानंतरही संपूर्ण सामना खेळून काढला. पण विशाखापट्टणममध्ये तो खेळू शकणार नाही. 32 वर्षी लीच सध्याच्या इंग्लंड संघातील सर्वात यशस्वी आणि अनुभवी फिरकीपटू आहे.
दुसरा कसोटी सामना सुरू होण्याआधी बेन स्टोक्स (Ben Stokes) याने माहिती दिली की, “जॅक लीच दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. हे नक्कीच चिंतादायक आहे. पण यावर काहीच करू शकत नाही.” लीच संघातून बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी सोएब बशीर याला संधी मिळू शकते. शोएब बशीरला संधी देण्याबाबत स्टोक्स म्हणाला, “जर त्याला संधी मिळाली, तर त्याने या सामन्याचा आनंद घेतला पाहिजे आणि नेहमी लक्षात राहील असं काहीतरी केलं पाहिजे. मी यासाठी त्याला पूर्ण मदत करेल. कारण प्रत्येकजण आपला कसोटी सामना एकदाच खेळत असतो.”
शोएब बशीर मुळचा पाकिस्तानचा आहे पण इंग्लंडसाठी आघामी सामन्यातून तो कसोटी पदार्पण करताना दिसण्याची पूर्ण शक्यता आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यासाठी शोएब संघासोबत खेळताना दिसू शकत होता. पण वेळ भारताचा विसा न मिळाल्याने त्याला संघासोबत भारतात येता आले नाही. शोएबला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्त अनुभव नाहीये. पण इंग्लंड संघ व्यवस्थापनाला त्याच्या गोलंदाजीवर पूर्ण विश्वास दिसत आहे. तत्पूर्वी हैदराबाद कसोटीत टॉम हार्टली याने कसोटी पदार्पण केले. हार्टलीने कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीत एकूण 9 विकेट्स घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. शोएबकडून देखील पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंड संघाला हार्टलीप्रमाणेच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. (England’s most successful player out of second Test! Ben Stokes was also shocked)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची रणनीती ठरली; मॅक्युलम म्हणतोय, ‘घाबरत नाही…’
विराटच्या कमबॅकपर्यंत उशीर होईल! विशाखापट्टणम कसोटीआधी माजी दिग्गज असं का म्हणाला?