भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) धरमशाला याठिकाणी सुरू होईल. इंग्लंड क्रिकेट संघ कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी आपली प्लेइंग इलेव्हन घोषित करत आला आहे. याही वेळी गुरुवारी सुरू होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने बुधवारी (6 मार्च) आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. पहिल्या चार सामन्यांनंतर भारतीय संघ 3-1 अशा आघाडीवर आहे. अशात मालिका शेवटच्या कसोटी सामन्याआधीच यजमान भारताच्या नावावर झाली आहे. असे असले तरी, पाहुणा संघ शेवटच्या कसोटीत विजय मिळवून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. उभय संघांतील हा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी धरमशालेत सुरू होत आहे.
England’s playing XI for the 5th Test:
Crawley, Duckett, Pope, Root, Bairstow, Stokes (C), Foakes (WK), Hartley, Wood, Bashir and Anderson. pic.twitter.com/ZYwkG8RZDq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 6, 2024
पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
(England’s playing XI announced for the Dharamshala Test)
महत्वाच्या बातम्या –
Rohit Sharma । क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे निधन, क्रीडाविश्वात शोककळा
‘झहीर-धोनीही 100 कसोटी सामने खेळू शकले असते, परंतु…’; आर अश्विनचा मोठा दावा