Jofra Archer Test Comeback: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना (10 जुलै) पासून सुरू होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. (India vs England 3rd Test) इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी एक दिवसापूर्वीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे आणि संघात एक बदल केला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे इंग्लंड संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. (Jofra Archer comeback Test)
जोफ्रा आर्चर 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतणार आहे. या मालिकेत इंग्लंडचा गोलंदाजीचा अटॅक आतापर्यंत खूपच कमकुवत दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की, आर्चरच्या पुनरागमनाने इंग्लंडचे बिघडलेले काम मार्गी लागेल का? त्याच्या आगमनाने संघाची गोलंदाजी मजबूत होईल का? (England bowling attack strengthened)
जोफ्रा आर्चरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, जिथे त्याच्या नावावर 42 विकेट्स आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 45 धावात 6 विकेट्स आणि सरासरी 31.6 ची राहिली आहे. मात्र, भारताविरुद्ध तो आतापर्यंत फक्त 2 सामने खेळला आहे. तेथे त्याने 3 डावांत 4 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 75 धावात 2 विकेट्स आहे. हा रेकॉर्ड पाहता भारतीय संघाच्या फलंदाजांना आर्चरला घाबरण्याचे कारण नाही. (Jofra Archer Test record vs India)
परंतु, इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर आर्चर खूप धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत या सामन्यात भारतीय फलंदाजांना त्याच्यासमोर सावधगिरीने फलंदाजी करावी लागेल. इंग्लंडमध्ये आर्चरचा रेकॉर्ड शानदार आहे. आर्चरने आपल्या देशात 8 कसोटी सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर लॉर्ड्समध्ये तो आतापर्यंत फक्त 1 सामना खेळला आहे आणि तेथे त्याने 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. (Jofra Archer home record)
जोफ्रा आर्चर बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघातून बाहेर होता. मात्र, त्याने काउंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आपली मॅच फिटनेस सिद्ध केली आणि त्यानंतर तो कसोटी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. जोफ्रा आर्चरने आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्धच फेब्रुवारी 2021 मध्ये अहमदाबादमध्ये खेळला होता. त्यानंतर तो दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर गेला होता. आता 4 वर्षांनंतर कसोटी संघात त्याचे पुनरागमन झाले आहे. (Jofra Archer Test cricket comeback)






