---Advertisement---

PAK vs ENG: इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ! कर्णधार हॅरी ब्रूकच्या शतकाने पाकिस्तानचं स्वप्न भंगलं

On: मंगळवार, फेब्रुवारी 24, 2026 10:49 PM
---Advertisement---

इंग्लंडने पाकिस्तानचा 2 विकेट्सनी पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे, (Pakistan vs England) तर दुसरीकडे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्णधार हॅरी ब्रूकने (captain of England harry brook century against Pakistan) इंग्लंडसाठी विजयी शतक झळकावून आपल्या संघाला ‘अंतिम-4’ मध्ये पोहोचवले.

पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 164 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 18 व्या ओव्हरमध्येच हे लक्ष्य गाठले. शाहीन आफ्रिदीने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या, पण त्याची ही मेहनत वाया गेली.

2026 टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये जाणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली; डावाच्या पहिल्याच चेंडूवर फिल साल्ट (Phill Salt) बाद झाला. पॉवरप्ले संपण्यापूर्वीच जोस बटलर आणि जॅकब बेथेल यांनीही आपल्या विकेट्स गमावल्या होत्या. टॉम बॅन्टन केवळ 2 धावा करून बाद झाल्यावर इंग्लंडच्या विजयाच्या आशा मावळू लागल्या होत्या. पण इंग्लंडसाठी कर्णधार ब्रूकने अप्रतिम खेळी केली.

शाहीन आफ्रिदीने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये फक्त 30 धावा देऊन 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र, त्याच्या या शानदार कामगिरीवर हॅरी ब्रूकचे झंझावाती शतक भारी पडले आणि त्याने इंग्लंडला विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---