मुंबई । इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये तिरंगी मालिका होण्याची शक्यता आहे. हा दौरा होणार असे निश्चित धरून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सरावासाठी महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडचा 24 सदस्यीय संघ 22 जूनपासून सरावासाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय महिला संघ 3 टी 20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱयावर जाणार होता. मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डास बोर्डाला तिरंगी मालिका भरविण्याविषयी प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नाही.
इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू सहा मैदानावर सराव अभ्यास करणार आहेत. खेळाडू सुरुवातीला वैयक्तिक सरावावर आणि त्यानंतर छोटय़ा छोटय़ा समूहात सराव करणार आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या दिशानिर्देशांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. खेळाडू सराव करताना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
सरावासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची नावे
टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, एलिस डेविडसन-रिचर्ड्स, फ्रेया डेविस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, केटी जॉर्ज, सारा ग्लेन, क्रिस्टी गॉर्डन, एमी जोन्स, हीदर नाइट, एम्मा लॅम्ब, नट साइवर आन्या श्रुबसोले, ब्रायोनी स्मिथ, लिन्सी स्मिथ, मॅडी विलियर्स, फ्रेंक विल्सन, लॉरेन विनफील्ड, इसवी वोंग अाणि डैनी वाइट या खेळाडूंची सरावासाठी निवड करण्यात आली आहे.