इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जाॅश बटलर सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.
नुकतेच पार पडलेल्या आयपीएल, पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका, ऑस्ट्रेलिया विरुद्धची एककदिवसीय मालिका आणि भारता विरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत जाॅश बटलरने दमदार कामगिरी केली आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील बुहुप्रतिक्षित कसोटी मालिकेपूर्वी जाॅश बटलरने एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना आयपीएल, विराट कोहली आणि या कसोटी मालिकेविषयी दिलखुलास चर्चा केली.
“विराट हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्याकडे कायम सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता आणि जिद्द आहे. मला आपीएलमध्ये विराटची फलंदाजी पाहून खूप काही शिकायला मिळाले.” असे बटलर विराट विषयी बोलताना म्हणाला.
गेली तीन वर्षे आयपीएलमध्ये खेळत असल्याने बटलरचे अनेक भारतीय क्रिकेटपटूंशी चांगले संबंध झाले आहेत. त्याविषयीसुद्धा बटलरने सांगितले.
“आयपीएलमुळे अनेक भारतीय खेळाडूंशी माझी चांगली मैत्री झाली आहे. मात्र मी जेव्हा इंग्लंडकडून मैदानावर उतरेन तेव्हा ते माझे प्रतिस्पर्धीच असतील.” असे बटलर म्हणाला.
तसेच आयपीएलमध्ये सहभागी झाल्याने बटलरला अनेक दिग्गज खेळाडूंना जवळून पाहता आले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या असे बटलर म्हणाला.
“आयपीएलमध्ये मला सर्वश्रेष्ठ फलंदाज यशस्वी होण्यासाठी काय करतात आणि ते का सर्वश्रेष्ठ आहेत हे जवळून पाहता आले.” असे बटलर म्हणाला.
बुधवारपासून (१ ऑगस्ट) भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–गांगुलीला मागे टाकत कॅप्टन कोहली होणार नवा ‘दादा’?
–Video: हा २ वर्षांचा चिमुकला ठरला आयसीसीचा ‘फॅन आॅफ द विक’